AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हल्ला आमच्यावर अन् अटक पण आमच्याच कार्यकर्त्यांना हा तर अन्याय; मनोज जरांगे पाटील संतापले

Manoj Jarange Patil on Anatarwali Sarati Attack Aropi Arrest : सरकारने आरोपींना कसं काय पकडलं?; अंतरवली सराटी गावातील हल्ला प्रकरणातील कारवाईवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. तसंच कारवाईवरही भाष्य केलंय. पाहा...

हल्ला आमच्यावर अन् अटक पण आमच्याच कार्यकर्त्यांना हा तर अन्याय; मनोज जरांगे पाटील संतापले
| Updated on: Nov 25, 2023 | 9:41 AM
Share

मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : अंतरवली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने सांगितलं होतं की, आम्ही कोणालाही अटक करणार नाही. आमचे लोक अटक करून सरकारला आम्हाला बदनाम करायचं आहे. त्यांनी आमच्या विरोधात बोलणे बंद करावं. आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात बोलणार नाही. सगळ्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आमचे आहेत. पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर त्यावर बोलेन. सरकारने सांगतिले होते अटक करणार नाही म्हणून तुम्ही अटक करून आमच्या आंदोलनाला डाग लावणार आहेत का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात सरकारने आरोपींना कसं काय पकडलं?, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.

‘त्या’ आरोपींना अटक

अंतरवली सराटी दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास ही अटक केली. अंबड पोलीस ठाण्याच्या लोकअपमध्ये आरोपींचा मुक्काम आहे. अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. आज सकाळी 11 वाजता अंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

जरांगे पाटील यांचा सवाल

सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करू नये. सरकारने गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता आमच्या लोकांना अटक का केली जात आहे?, असं सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. अजित पवार म्हणतात तसंच आम्हीही म्हणतो. पोलिसांनी दबावाला बळी पडूच नये. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम केलंच पाहिजे पण निष्पाप लोकांवरही अन्याय होऊ नये, याकडेही त्यांनी लक्ष द्यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

अजित पवार म्हणाले…

अंतरवली सराटी हल्ला प्रकरणात पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करावी. तपासातून वस्तुस्थिती समोर येईल आणि ज्यांच्या चूक असतील, त्यांना कडक शासन होईल, असं अजित पवार म्हणालेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.