AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : बेपारी आहात तर व्यापार करा, आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका – संदीप देशपांडेंनी ठणकावलं

मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मनसे आणि भाजप आमनेसामने आले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या घटनेचा बचाव केला आहे तर भाजप नेते नितेश राणे यांनी मनसेला आव्हान दिले. देशपांडे यांनी व्यापाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.

MNS : बेपारी आहात तर व्यापार करा, आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका - संदीप देशपांडेंनी ठणकावलं
मनसे नेते संदीप देशपांडेImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 04, 2025 | 10:00 AM
Share

मराठी बोलण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असून त्याचा एक व्हिडीओ सशोल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. त्या मारहाणीच्या निषेधार्थ काल मीरा-भाईंदरमध्ये अनेक व्यापारी तसेच व्यापारी संघटनांनी आंदोलन करत मोर्चा काढला, मारहाणीचा विरोध दर्शवत निषेधही केला. यावरून मनसे नेते, कार्यकर्त्यांवरही बरीच टीका होत असून भाजपाचने नेत्यांनी मनसेला सुनावलं होतं.

मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल

या वरून राजकीय वातावरण तापलेलं असून त्याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रोखठोक भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे. मराठीला विरोध करणाऱ्यांना आणि मनसेला लक्ष्य करणाऱ्या सर्वांनाच संदीप देशपांडेनी सज्जड भाषेत इशाला दिला आहे. ‘ काल भारतीय जनता पक्षाने 2-3 व्यापारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला. त्या बेपारी लोकांना (व्यापारी) माझं सांगणं आहे, बेपारी आहात, बेबापर (व्यापर) करायाला आला आहात, बेपार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका ‘ अशा थेट शब्दांत संदीप देशपांडेनी सर्वांना ठणकावलं आहे. ‘ मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल.’ असा इशाराही त्यांनी दिला.

आणि एकदा बेपारी लोकांनी ठरवावं आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत रहायचं आहे की व्यापार करायचा आहे, हे एकदा त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी अशा शब्दांत संदीप देशपांडेनी सज्जड दम दिला.

हिंमत असेल तर मोहम्मद अली रोड, नळबाजारात दाखवा… नितेश राणेंनी दिलं होतं आव्हान

मीरा रोड येथे मराठी भाषेवरून सुरू असलेला वाद मनसे कार्यकर्त्यांनी एका गुजराती रेस्टॉरंट मालकाला मारहाण केल्याने आणखी वाढला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच राज्यात राजकीय खळबळ उडाली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद पेटला. काहींनी या घटनेचे समर्थन करायला सुरुवात केली तर काहींनी मनसे कार्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. त्यावर राज्य सरकारचे मंत्री, भाजप नेते नितेश राणे यांनी मनसे नेत्यांना आव्हान दिले होते.

मराठी न बोलता आल्यामुळे मीरा रोडमध्ये एका माणसाला झालेल्या मारहाणीबद्दल महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे म्हणाले की, एका हिंदूला मारहाण करण्यात आली आहे. मी म्हणतो की तुम्ही नळ बाजार आणि मोहमद अली रोड, तिथे जाऊनही हिंमत दाखवा ना. गोल टोप्या घातलेले,दाढीवाले, ते मराठी बोलतात का? तिथे जाऊन त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजण्याची हिंमत तुमच्यात नाही का? असा सवाल विचारत नितेश राणेंनी मनसे कार्यकर्त्यांना आव्हान दिले होते. आमच्या कोणत्याही हिंदूला अशा पद्धतीने कोणी मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करेल, असा इशाराही नितेश राणेंनी दिला होता.

रझा अकदामीविरोधात मोर्चा काढला तेव्हा भाजप गप्प होतं

राणेंच्या या टीकेलाही मनसे नेते संदीप देशपांडेंनी चोख प्रत्युत्तर दिलं. माझा नितेश राणेंना एक प्रश्न आहे की ज्यावेळी रझा अकदमीचा मोर्चा निघाला होता, तेव्हा आमच्या पोलीस माता-भगिनींवर मुसलमानांनी हात उचलला होता. त्यावेळेस त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष होता, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तेव्हा सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसले होते. मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडली तेव्हा… काटा चालवणाऱ्यांना आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये, असेही संदीप देशपांडे यांनी थेट सुनावलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?