AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियानच्या कुटुंबाला डर्टी पॉलिटिक्समध्ये ओढू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची हात जोडून विनंती!

दिशाच्या आत्महत्येनंतर हे कुटुंब सगळ्याच बाजूने ते पोरके झालेत. तर समाज म्हणून आपलं काम आहे की, अशा फॅमिलीला जगण्याची आशा उत्पन्न करुन त्यांच्यासोबत राहणं हे आपलं काम आहे. परत या विषयी त्यांना त्रास होईल, असं करु नका, अशी विनंती किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

दिशा सालियानच्या कुटुंबाला डर्टी पॉलिटिक्समध्ये ओढू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची हात जोडून विनंती!
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 1:56 PM
Share

मुंबईः दिवंगत अभिनेता सुशांत सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) हिच्या मृत्यूवरून भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. दिशा सालियान हिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय, यामुळे दिशा सालियानच्या कुटुंबाला आणखी जबरदस्त धक्का बसला आहे. अशा बातम्यांमुळे या कुटुंबाला त्रास होत असून यापुढे त्यांना त्रास देऊ नका, अशी विनंती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज दिशा सालियान यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूनंतर आणि यासंबंधीच्या बातम्यांमुळे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून समाजातूनही त्यांना नाकारलं जात आहे. त्यामुळे कृपा करून आता त्यांना फार त्रास देऊ नका, अशी हात जोडून विनंती किशोरी पेडणेकर यांनी केली.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

दिशा सालियान यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘ज्या कुटुंबियांचा कशाचीच काही संबंध नाही, त्यांना आपल्या डर्टी पॉलिटिक्समध्ये ओढणं, त्यांना त्रास देणं योग्य नाही. आत्महत्या झाल्यापासून दिशाच्या वडिलांच्या पायावर पाच ऑपरेशन झाले. हे कुटुंब दोन वर्षांपासून टीव्ही बघत नाही. सोशल मीडिया पाहात नाही. पेपर आणत नाही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला जे काही माहिती आहे, ती सर्व पोलिसांकडून घ्या. माध्यमांवर सतत तिचं नाव घेतल्यामुळे कुटुंबियांना खूप त्रास होतोय. ते खूप सामान्य कुटुंब आहे. त्यांच्याकडे आशेचा किरण काहीच नाहीये. फक्त दोघं एकमेकांसाठी जगतायत. त्या शांततेनं जगू द्या. दिशा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. नुकतीच ती नावारुपाला येत होती. ती खूप संवेदनशील मनाची होती, असं आई वडिलांचं म्हणणं आहे. तिचे काही डील, बिझनेस डील फेल गेले. आणि आत्ताची युवा पिढी खूप कमकुवत मनाची आहे, हे आपल्याला अनेक गोष्टीतून दिसतंय. त्यातली एक दिशापण होती. सध्या दिशाचे पालक खूप भावून झाले आहेत. त्यामुळे त्यांना मी सांगितलंय की, यानंतर तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. एक महिला म्हणून, आई म्हणून मी त्यांना नक्कीच सपोर्ट करेन.’

दिशाच्या पालकांना उभारी मिळण्यासाठी मदत करणार- महापौर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, दिशाच्या पालकांना मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. ते अॅनिमल लव्हर्स आहेत. त्यांना त्यातही आम्ही मदत करू. पण त्रास देणं कमी करुयात. कारण दिशाचे पालक म्हणतात की, सतत बातम्या ऐकून नातेवाईकही त्यांच्याकडे येत नाहीत. सगळ्याच बाजूने ते पोरके झालेत. तर समाज म्हणून आपलं काम आहे की, अशा फॅमिलीला जगण्याची आशा उत्पन्न करुन त्यांच्यासोबत राहणं हे आपलं काम आहे. परत या विषयी त्यांना त्रास होईल, असं करु नका, अशी विनंती मी करते.

दिशा सालियान प्रकरणात नवे आरोप काय?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियान हिने आत्महत्या केली नसून तिची बलात्कारानंतर हत्या झाली होती. हे सर्व घडत असताना कोणत्या मंत्र्याचे सुरक्षा रक्षक बाहेर उभे होते, हेही लवकरच कळेल, यासंबंधीची चौकशी लवकरच होईल, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा आरोपांची राळ उठवली आहे. तर नितेश राणे यांनीदेखील दिशा सालियान हिच्या घराबाहेर एक काळी मर्सिडीज दिसते. तशीच एक मर्सिडीज सचिन वाझेंकडेही आहे. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, महिला आयोगाने नारायण राणे यांच्या आरोपांची दखल घेतली असून अशी वक्तव्ये करून मृत्यूनंतरही दिशा सालियानची बदनामी केली जात आहे, याची गंभीर दखल घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. येत्या 24 तासात मालवणी पोलीसांना यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत.

इतर बातम्या-

VIDEO | नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग वर्षभरात होणार सुरू; शेतकऱ्यांच्या घरी कशी आली समृद्धी, कसा आहे प्रकल्प?

Sunil gavaskar: गावस्करांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली, तर विराट कोहलीचं काय होणार?

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.