दिशाला ज्या काळ्या मर्सिडीजने पार्टीतून घरी आणलं, ती वाझेची? नितेश राणेंची चार सनसनाटी ट्वीट्स

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सकाळ-सकाळी ट्वीट करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

दिशाला ज्या काळ्या मर्सिडीजने पार्टीतून घरी आणलं, ती वाझेची? नितेश राणेंची चार सनसनाटी ट्वीट्स
दिशा सालियान, नितेश राणे, सचिन वाझे
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 7:55 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) यांच्या मृत्यू प्रकरणावरुन उडालेला धुरळा काही केल्या शांत होताना दिसत नाही. राणे कुटुंबीयांनी दिशा सालियानच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका आजही सुरुच आहे. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आली, ती वाझेची आहे का, असं नितेश राणेंनी सुचवलं आहे.

नितेश राणेंच्या चार ट्वीट्समध्ये काय?

“मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद राहिली आहे. आता त्यांना दिशा सालियान केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. आठ तारखेच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशासोबत राहणारा रोहन राय सर्वांसमोर येऊन मोकळेपणाने का बोलत नाही?” अशा आशयाचं ट्वीट भाजप आमदार नितेश राणे यांनी आज (मंगळवार) सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी केलं.

“मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना दिशा सालियान केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितलं. त्यामुळे आठ जूनच्या रात्री काहीच घडलं नाही, असं दाखवून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. मला आनंद वाटला, किमान ते स्वतःचीच कबर तरी खणत आहेत” असा टोला नितेश राणेंनी हाणला आहे.

“दिशाला आठ तारखेच्या रात्री (8 जून 2020 – दिशा सालियानच्या मृत्यूचा दिवस) ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? वाझेला पोलीस दलात 9 जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आलं होतं. कनेक्शन?” असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.

“मालवणी पोलीस ठाण्याने निष्पक्ष तपास न केल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. बरोबर? आणि आता त्याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले? हे कितपत योग्य आहे? ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?” असा प्रश्नही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

वाचा नितेश राणेंचं ट्वीट थ्रेड

महापौरांची महिला आयोगाकडे धाव

सुशांतसिंग राजपूतची व्यवस्थापक राहिलेल्या दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नाही. तसंच त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याला तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे

संबंधित बातम्या :

सुशांतसिंग, दिशा सालियान प्रकरणात महापौरांचं राज्य महिला आयोगाला पत्र, मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल देण्याचे आदेश

दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब?; राणेंचा पुन्हा हल्लाबोल

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू; वाढदिवशी फोटो होतोय ट्रेंड

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.