AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Railway Mega block Updates : घरातून बाहेर पडताना 10 वेळा विचार करा, दोन वेळा वेळापत्रक तपासा… रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट काय?

मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवार, १७ मे रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ठाणे-कल्याण, पनवेल-वाशी तसेच पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी ब्लॉक घेतला जाईल. यामुळे लोकल फेऱ्या रद्द होतील, काही गाड्या वळवण्यात येतील तर मेल-एक्स्प्रेसला विलंब होईल. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा.

Mumbai Railway Mega block Updates : घरातून बाहेर पडताना 10 वेळा विचार करा, दोन वेळा वेळापत्रक तपासा... रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट काय?
रेल्वे मेगाब्लॉक
| Updated on: May 16, 2026 | 9:40 AM
Share

संध्याकाळी घरी परतण्यासाठी याच लोकलचा वापर मुंबईकरांकडून केला जातो. मात्र अहोरात्र धावणारा, अविरत प्रवास करणाऱ्या या लोकलनाही गेखभाल, दुरूस्तीची गरज असते, आणि त्यासाठी या तिन्ही मार्गांवर आलटून पालटून ब्लॉक घेत, ही कामं केली जातात. उद्या, म्हणजेच रविवार 17 मे रोजीदेखील रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारची सुट्टी, मुलांच्या शाळांना लागलेल्या सुट्ट्या हे पाहून भटकण्यासाठी बाहेर पडण्याचा विचार असेल तर आधी ही बातमी वाचा आणि मगच प्लान आखा.

मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक

ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने उद्या रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. दादर स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि नायगाव स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही.

मेगाब्लॉक कधी, कुठे ?

मध्य रेल्वे : ठाणे ते कल्याण , अप आणि डाउन जलद मार्गावर

वेळ : सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत

परिणाम : ब्लॉकच्या या वेळेत अप आणि डाउन जलद लोकल, अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कळवा, मुंब्रा, दिवा स्थानकांतही लोकल थांबतील.

हार्बर मार्ग : पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाउन मार्गावर

वेळ : सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत

परिणाम : सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते :पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहतील. ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे : नायगाव स्थानकात नवीन पादचारी पुलाचे दोन स्पॅन गर्डर उभारले जाणार आहेत

वेळ : शनिवार मध्यरात्रीनंतर 1 ते रविवारी पहाटे 4 दरम्यान अप आणि डाउन धीमा मार्ग बंद राहणार. तसेच मध्यरात्रीनंतर 2.30 ते 3.30 दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

परिणाम : ब्लॉक वेळेत लोकल गाड्या पर्यायी मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 13 मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 20 मिनिटे ते 2 तास अशा विलंबाने धावणार आहे.

डोंबिवली लोकलमधून पडून तरुण जखमी

दरम्यान डोंबिवलीकडून मुंबईत कामावर निघालेला गणेश अय्यर (वय 23) हा तरुण गर्दीच्या लोकलमधून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गुरुवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत जखमी झालेल्या या तरुणावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा