
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. धमाकेदार कामगिरी भाजपाची बघायला मिळाली. विशेष म्हणजे राज्यातील अनेक महापालिकांवर एकहाती सत्ता भाजपची आली. 29 महापालिकांपैकी जर सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक कोणती असेल तर ती मुंबई महापालिकेची आहे. पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे एकत्र आली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या. मात्र, अपेक्षित यश त्यांना मिळाले नाही. मराठी माणसासाठी ही निवडणूक लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या 66 जागा आल्या आणि मनसे 9 जागांवर विजयी झाले. भाजपा 89 आणि शिवसेना शिंदे गट 29 जागांवर विजयी झाले. मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला. मुंबई महापालिकेत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला.
भाजपा जरी मुंबई महापालिकेत मोठा पक्ष ठरला असला तरीही एकहाती सत्ता महापालिकेत मिळाली नाही. एकनाथ शिंंदे यांच्या नगरसेवकांची मदत घेतल्याशिवाय भाजपा सत्ता स्थापन करू शकणार नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले. 29 नगरसेवक निवडून येताच एकनाथ शिंदे यांनीही मुंबईच्या महापाैरपदावर दावा केला असून अडीच वर्ष भाजपा आणि अडीच वर्ष शिवसेनेचा महापाैर असल्याचा त्यांनी स्पष्ट केले.
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
भाजपाला अडीच वर्ष महापाैरपद पाहिजे नसून पाच वर्ष भाजपाचाच महापाैर हवा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, कारण सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला. यादरम्यानच शिंदे यांनी आपले सर्व 29 नगरसेवक ताज लॅन्ड हॉटेलमध्ये ठेवले आहेत. नगरसेवक फुटले जाऊ नये, याकरिता काळजी घेतली जात आहे. यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत.
यामुळे शिंदेंना आपले नगरसेवक फुटण्याची अधिक भीती असल्याने थेट नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी कालही बोलताना म्हटले की, आजही माझी इच्छा आहे की, मुंबईचा महापाैर शिवसेनेचाच व्हावा. यामुळे महापालिकेवरील सत्ता मिळवण्यासाठी अजूनही ताकद लावली जात असल्याचे बघायला मिळत आहे.