नेव्ही ऑफिसरनं बायको, 2 मुलांसह घेतला टोकाचा निर्णय; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती उघड
नेव्ही ऑफिसरने कुटुंबातील सदस्यांना संपवून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नेव्हीनगरमध्ये हादरवणारी घटना घडली. या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. नेव्हीनगरच्या नौदलातील जवान पुराणमल मेहराने पत्नी ओमा, दोन मुलांची आधी हत्या केल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. त्याने पत्नी आणि दोन महिन्यांच्या मुलाचा उशीने गुदमरवून जीव घेतल्याचा संशय आहे. त्यानंतर मोठा मुलाला विषारी पदार्थ दिल्याचा संशय आहे. परंतु या प्रकरणात विषतज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कुटुंबातील सदस्यांची माहिती समोर आल्यानंतर पुराणमलने घराच्या हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुराणमलने 14 ऑगस्ट रोजी ‘आमचे मृतदेह घेऊन जा’ असा वडिलांना व्हॉट्सअॅपला मेसेज केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी नौदल नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पुरणमलने टोकाचा निर्णय घेण्याआधी त्याच्यासह बायकोचा मोबाईल फॉरमॅट मारल्याचंही तपासात समोर आलं आहे. आता पोलिसांचा डिलीट केलेला डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुराणमल हा उपचार सुरू असल्याने रजेवर होता. त्याने कौटुंबीक, आर्थिक तणाव, वैवाहिक वाद आणि मानसिक अस्वस्थतेमुळे आयुष्य संपवल्याचे सांगितले जात आहे. आता या प्रकरणी पुराणमलच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराणमल प्रकरणात 8 जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याचा भाऊ, त्याचे डॉक्टर, घरात काम करणाऱ्या महिलेसह त्याच्या मित्रांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पुराणमलची समजूत काढण्यासाठी त्याचे वडील मुंबईत आले होते. त्यावेळी त्याने पत्नीचा मोबाईल जमिनीवर आपटला होता. आता पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या कुलाबा येथील नौदलाच्या शासकीय निवासस्थानी नेव्ही ऑफिसरसह बायको, दोन मुलांचे मृतदेह आढळले होते .पुराणमल शंभूलाल मेहरा असे जवानाचे नाव आहे. तर पत्नीचे नाव ओमा मेहरा आहे. मुलगा यश हा तीन वर्षांचा होता. मुलगी अवघ्या दोन महिन्याची होती. या सर्व जणांचे मृतदेह घरात आढळले. पुराणमलचा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तर कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह मृतावस्थेत होती. या संपूर्ण घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. ही संपूर्ण घटना 15 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती.