मुंबईकरांनो, बाहेर पडण्याआधी ‘हे’ नक्की वाचा; मध्य रेल्वेवर पुन्हा मेगाब्लॉक, कधी? कुठे ?
मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलवर लाखो प्रवासी अवलंबून असतात. ही सेवा अविरत सुरू रहावी यासाठी वेळोवेळी लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिनही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येतात.

मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलवर लाखो प्रवासी अवलंबून असतात. ही सेवा अविरत सुरू रहावी यासाठी वेळोवेळी लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिनही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येतात. काही दिवसांपूर्वी सीएसटी स्थानक व ठाणे स्थानक येथील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मध्य रेल्वे मार्गावर ३ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा मध्य रेल्वेवर येत्या रविवार 16 जून रोजी, मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारची सुट्टी म्हणून बाहेर पडायचा विचार करत असाल तर ही बातमी आधी नक्की वाचा आणि मगच तुमचा प्लान आखा. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवण्यात येणार आहे.
कुठे आहे मेगा ब्लॉक ?
सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग
सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10:25 ते दुपारी 2:45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
सकाळी 10:50 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि 15 मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.
डाऊन धिम्या लाइनवर :
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून सकाळी 10:20 वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून दुपारी 3:03 वाजता सुटणार आहे.
अप धिम्या लाइनवर :
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल. जी सकाळी 11:10 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कसारा लोकल सीएसएमटी येथे दुपारी 3:59 वाजता पोहोचेल.
अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत
पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी 10:34 ते दुपारी 3:36 पर्यंत सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10:16 ते दुपारी 3:47 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईकडे सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
डाऊन हार्बर मार्गावर :
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10:18 वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल सीएसएमटी मुंबई येथून दुपारी 3:44 वाजता सुटणार आहे.
अप हार्बर मार्गावर :
सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी 10:0R वाजता पनवेल येथून सुटणार आहे . सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3:45 वाजता सुटणार आहे.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
