मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणा कनेक्शन समोर

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणा कनेक्शन समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 30, 2025 | 8:53 PM

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, मुंबई पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आलं आहे, घटनास्थळावरून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, लॅपटॉप, इंक आणि कलर प्रिंटरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.  घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या मालवणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून,  पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, लॅपटॉप, इंक आणि कलर प्रिंटरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक हिंडे यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. काही लोक मालवणीतील साई बाबा मंदिराजवळ बनावट नोटांचा व्यापार करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले आणि आरोपींना ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट ५०० रुपयांच्या १७४० नोटा, नोटा छापण्याचे यंत्र, लॅपटॉप आणि इतर लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अट केली आहे.

संपत सामवय्या एंजलपल्ली (४३) आणि रहीमपाशा याकूब शेख (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे दोघेही तेलंगणाचे रहिवासी आहेत.  पोलिसांनी या आरोपींकडून २३ लाख ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. मालवणी पोलिसांनी या प्रकरणात  दोन आरोपींना अटक केली आहे,  आता त्यांचे नेटवर्क किती राज्यांमध्ये पसरलेले आहे? त्यांच्याशी आणखी किती लोक जोडले आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे, आरोपींकडून तब्बल ५०० रुपयांच्या १७४० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच इतरही साहित्य जप्त करण्यात आलं आहे.