AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांत पाणीसाठा वाढला; आता 7 धरणात किती साठा? जाणून घ्या

mumbai water level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पाणीसाठा वाढलाय. मागील 24 तासांतही चांगलाच पाणीसाठा वाढालाय.

Mumbai Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांत पाणीसाठा वाढला; आता 7 धरणात किती साठा? जाणून घ्या
| Updated on: Jul 06, 2026 | 2:49 PM
Share

मुंबई आणि आजूबाजू्च्या शहरात मागील 6 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईकरांचे टेन्शन कमी केलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जलाशयातील पाणीसाठा वाढला आहे. मागील 24 तासांतील ७ धरणातील पाणीसाठा 16.92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मागील 24 तासांत एकूण साठ्यात 3.73 टक्के इतकी वाढ झालीये.

मुंबई शहराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या सर्व 7 जलाशयात 14,47,363 दशलक्ष लीटर इतकी असून काल 6 वाजेपर्यंत धरणांत 2,44,900 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा जमा झालाय. मागील सात दिवसांत बरसलेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा झालाय?

अप्पर वैतरणा – 4.99% तुळशी – 82.14% विहार – 90.61% भातसा- 14.12% तानसा – 17.34% मोडक सागर – 30.96% मध्य वैतरणा – 18.35%

मागील २४ तासांत कोसळणार्‍या पावसाने मुंबईकरांना दिलासा दिलाय. या मुसळधार पावसामुळे 7 धरणात पाणीसाठा वाढला आहे. भातसा धरणाची पातळी 2.10 मीटरने वाढली आहे. मोडक सागर धरणाची पाणीपातळी 0.91 मीटरने वाढली आहे. तर तानसा धरणाची पातळी 0.75 मीटरने वाढली आहे. मध्य वैतरणा धरणात पाणीपातळी 1.90 मीटरने वाढली आहे. तर तुळशी धरणाची पातळी 1.13 मीटरने पाणीसाठा वाढला. हवामान विभागने 8 जुलैपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे 7 धरणांत आणखी पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरणाजवळ पर्यटकांची गर्दी

पुण्यातील खडकवासला धरणातही परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी पुणे आणि परिसरातून हजारो नागरिक सहकुटुंब खडकवासला चौपाटीवर दाखल होत आहे. पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने सिंहगड रस्ता आणि धरणाजवळील मार्गावर संथ गतीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस घटनास्थळी तैनात आहेत. या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणांत पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुण्यातील विविध भागात पाऊस सुरू आहे. पुण्याच्या आळंदी भागातील इंद्रायणी नदीने धोकादायक पातळीने ओलांडली आहे.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?