AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात भलं मोठं झाड वाहनांवर कोसळलं, नागरिकांची उडाली धांदल

mumbai rain update : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. चेंबूरनंतर आता चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळण्याची घटना घडली आहे.

मोठी बातमी! चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात भलं मोठं झाड वाहनांवर कोसळलं, नागरिकांची उडाली धांदल
| Updated on: Jul 02, 2026 | 10:46 AM
Share

मुंबईत मागील 3 दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे. अनेकांना पाण्यातून वाट काढत चालावे लागत आहे. तर दुसरीकडे झाड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मुसळधार पावसादरम्यान चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. चेंबूरमधील ही घटना ताजी असताना चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या परिसरातही झाड कोसळण्याची घटना घडली आहे. चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात भलं मोठं झाड रस्त्यांवर उभ्या वाहनांवर कोसळलं. झाड कोसळल्याने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या लोकांची एकच धावाधाव झाली.

मुंबई आणि परिसरात जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसांपासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत 90 हून अधिक ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली आहे. चेंबूरमध्येही झाड कोसळल्याची घटना घडली. तर दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर भागात मंगळवारी रात्री दुर्घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीचा भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. संतोष बारस्कर (51) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर आज गुरूवारी सकाळी चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात झाड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही. परंतु या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन पावसात मुंबईत झाड कोसळण्याच्या घटना वाढू लागल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईत अंधेरी सबवेमध्ये भरलं पाणी

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू असल्याचे दिसत आहे. मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यानंतर हा मार्ग बंद करण्यात आलाय. अंधेरी सबवेसह आजूबाजूचे नालेही भरले आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या रस्त्यांवरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे सबवे दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलाय.

नवी मुंबईत रस्त्यांना तळ्याचं स्वरूप

नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केट परिसरातील आतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. खरंतर रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आलं आहे. त्यामुळे रस्त्यातून व्यापारी आणि ग्राहकांना मार्ग काढावा लागतोय. एपीएमसी भाजीपाला मार्केट परिसरातील रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

मिरा-भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर कोसळलं झाड, दुचाकीस्वार गंभीर

मिरा भाईंदरच्या राई गावात मोठी दुर्घटना घडली. मिरा-भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मुसळधार पावसादरम्यान रस्त्यावरून जात असताना अचानक नारळाचा वृक्ष दुचाकीवर कोसळून हा अपघात घडला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी अत्यंत तत्परता दाखवत जखमी तरुणाला झाडाखालून बाहेर काढले. नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Follow Us
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजुर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स