AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Red Alert : सावधान… धोका वाढला, हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा, हेल्पलाईन नंबर जारी

Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. मुंबईसह अनेक भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. आता नागरिकांना अत्यंत मोठा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंब

Mumbai Red Alert : सावधान... धोका वाढला, हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा, हेल्पलाईन नंबर जारी
Mumbai Red Alert
| Updated on: Aug 19, 2025 | 9:17 AM
Share

मुंबईत रात्रभर पाऊस सुरू असून पहाटे पावसाचा जोर वाढलाय. दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलंय. आज मुंबईला रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मुंबईसह पुण्यात देखील धुवाधार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये अलर्ट जारी केला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की, अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. यासोबतच हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलाय.

पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहोत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100 / 112 / 103 डायल करा, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय. आता परत पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्त्यांमध्ये गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचल्याचे बघायला मिळतंय. जागोजागी महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर थांबल्याचे बघाायला मिळतंय.

हिंदमाता परिसरातले पंप सुरू आहे. मुंबईतील कांदिवली मालाडमध्ये मुसळधार पाऊस आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझ, खार, वांद्रे या उपनगरांसह सर्व भागात पाऊस पडतोय. अनेक सखोल भागात पाणी साचले आहे. मुंबई ठाणेमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वे वर काही अंशी परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

जलद लोकल 15 मिनिट उशिराने तर धिम्या लोकल 10 मिनिट उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत असून चाकरमानी वर्गांची संख्या कमी आहे. दादरच्या रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झालीये. सोमवारी झालेल्या पावसाने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवासी वर्गांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. आज देखील पुढील 24 तास महत्वाचे असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. रात्रभर पावसाने दादरच्या स्टेशन बाहेर पाणीच पाणी साचले आहे. रस्ता झाला जलमय आहे. सोसायटीमध्ये देखील आत मध्ये पाणी शिरलं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा