Navneet Rana | लिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची तक्रार, नवनीत राणा MRI प्रकरण भोवणार

एकूणच लिलावती रुग्णालय प्रशासनची नवनीत राणा केससंदर्भातील भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. प्रशासनाच्या अशा वर्तणुकीमुळे इतर रुग्णांच्या जीवाला धोका संभवू शकतो, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

Navneet Rana | लिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची तक्रार, नवनीत राणा MRI प्रकरण भोवणार
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 11:55 AM

मुंबईः नवनीत राणा यांच्या MRI वरून शिवसेनेनं आज लिलावती रुग्णालयाविरोधात (Lilavati hospital) पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पोलीस ठाण्यात पोहोचलं. नवनीत राणा (Navneet Rana) यांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले गेले, हा मुख्य आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणा यांचे फोटोसेशन झालेच कसे? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला. सेनेने आज बांद्रा पश्चिम पोलीस ठाण्यात लीलावती रुग्णालय प्रशासन विरोधात लेखी तक्रार दाखल केली. सेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि युवा सेनेचे राहुल कणाल यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयात धडक देवून प्रशासनाला धारेवर धरले होते. आज या चौघांनी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशन गाठून रुग्णालय विरोधात तक्रार दाखल केली.

‘इंडियन मेडिकल कौंसिलकडेही तक्रार कऱणार’

लिलवाती रुग्णालयाविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर शिवसेनेचं हे शिष्टमंडळ इंडियन मेडिकल कौंसिलकडे करणार असल्याचं शिवसनेनं सांगितलं आहे. त्यामुळे या संस्थेमार्फतही लिलावतीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे आक्षेप काय?

नवनीत राणा यांचे एमआरआय सुरु असताना त्यांनी मान वर करून पाहिल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. स्पाँडिलेसिसच्या रुग्णाला अशा प्रकारे मान वर करून पाहता येत नाही, मग नवनीत राणा यांची ही ड्रामेबाजी सुरु होती का? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. तसेच नवनीत राणा यांचे मान आणि पोटाच्या दुखण्यासंदर्भात दोन एमआरआय केल्याचं रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आलं. त्याचा रिपोर्ट अद्याप का आला नाही, असा सवालही शिवसेनेनं केला आहे. नवनीत राणा यांनाही यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आधी उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या दुखण्याचा रिपोर्ट द्या, मग मी माझ्या दुखण्याचे रिपोर्ट दाखवते, असं प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी दिलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.