जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ, सर्वोच्च न्यायालयात ५०० पानांचे आरोपपत्र, काय आहे प्रकरण

Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच हे आरोपपत्र दाखल झाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ, सर्वोच्च न्यायालयात ५०० पानांचे आरोपपत्र, काय आहे प्रकरण
jitendra awhad and supreme court
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 9:54 AM

मुंबई : ठाण्यातील अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार आहे. ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. सर्वोच्च न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अनंत करमुसे यांनी ठाणे येथील वर्तकनगर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांना 90 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांनी केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या त्यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा करमुसे यांनी करत आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाड यांना झाली होती अटक

या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना 14 ऑक्टोंबर 2021 रोजी अटकही झाली होती. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करत दहा हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका केली होती. त्यावेळी त्यांच्या अटकेची बातमी गुप्त राहिली होती. सोमय्या यांनी ट्विट केल्यानंतर ही बातमी फुटली होती.

काय म्हणतात जितेंद्र आव्हाड

अनंत करमुसे सर्वोच्च न्यायालयात गेल्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात त्याचे वकील कोण कोण होतं याची यादी काढा मग तुम्हाला समजेल हा पैसा कुठून आला आहे. जो अधिकारी चौकशी करत होता त्या अधिकाऱ्याची पोस्टिंग कुठे कुठे होते ते बघा. म्हणजे एका राजकीय पक्षाच्या ताटाखालचं मांजर असलेला अधिकारी चौकशी करत होता. आत्तापर्यंत या प्रकरणी 4 आरोपपत्र दाखल झाले. अनेक वेळा अनेक कागदपत्रे दिली गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक मेडिकल सर्टिफिकेट अचानक आलय. एवढ्या दिवस कुठे होत हे मेडिकल सर्टिफिकेट, उच्च न्यायालयात ते का नाही दाखवलं, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय आकसापोटी ही कारवाई सुरू असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे आरोपपत्राला फारसं महत्त्व द्यायचं नसतं हे सर्व सुरूच असतं. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी ठाण्यामध्ये धावपळ सुरू आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.