AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus: क्वॉरंटाईनपासून ते लॉकडाऊनपर्यंत… बैठकीत काय निर्णय घेतले?; राजेश टोपेंनी दिले प्रत्येक प्रश्नांचे उत्तर

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Coronavirus: क्वॉरंटाईनपासून ते लॉकडाऊनपर्यंत... बैठकीत काय निर्णय घेतले?; राजेश टोपेंनी दिले प्रत्येक प्रश्नांचे उत्तर
rajesh tope
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 1:00 PM
Share

मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्वॉरंटाईन कालावधी किती दिवसांचा असावा इथपासून ते लॉकडाऊन लावावा की लावू नये आदींबाबत आज मोठे निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधला. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही तर अँटिजेन टेस्टवर आपण भर देणार आहोत. अँटिजेनच्या टेस्ट वाढवाव्या लागतील. अँटिजेन टेस्ट किट खरेदी केली तर त्याचा हिशोब जिल्हा प्रशासनाला कळवला पाहिजे. अँटिजेनमध्ये किती पॉझिटिव्ह होतात याचा रेकॉर्ड ठरवला पाहिजे. त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.

आरटीपीसीआरवर भर

कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहे. रुग्णसंख्या 30 हजारापर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाचा आरटीपीसीआर केल्यास ताण पडेल. दीड ते पावणे दोन लाख आरटीपीसीआर दरदिवशी करण्यात येणार आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट करणार. अँटिजेनवर पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीआर होणार नाही. किऑस्क द्वारे अँटिजेन कराव्यात, अशा सूचनाही संबंधितांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

क्वॉरंटाईन कालावधी सात दिवसांचा

फेवीपिराविर आणि मोनू पिरावीर ही दोन औषधे प्रभावी ठरत आहेत. मात्र मोनू पिरावीरची उपलब्धता नाही. एक लाख ड्रग्ज आहेत. अधिक डोस देण्याची केंद्राला विंती केली आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच आता क्वॉरंटाईनचा कालावधी 7 दिवसांचा करण्यात आला आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना ज्या भाषेत समजत असेल त्यांना त्या भाषेत समजावून त्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शंभर टक्के लॉकडाऊनची गरज नाही

यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं. केंद्र सरकारने ऑग्युमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द वापरला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन शब्द वापरता येणार नाही. आज शंभर टक्के लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. पण नॉन इसेन्शियल अॅक्टिव्हिटी तपासणार. ज्या अॅक्टिव्हिटीची गरज नाही ती थांबवणार. व्हायरस रोखण्यासाठी गर्दी थांबवणं गरजेचं आहे. आजच निर्बंध आणावेत असं नाही. पण तपासून निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांना सर्व बाबी सांगून त्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.

70 आमदार, 15 मंत्री पॉझिटिव्ह

राज्यातील जवळपास 70 आमदार आणि 10 ते 15 मंत्री पॉझिटिव्ह आहेत. या सर्व आमदार-मंत्र्यांना खबरदारीचे उपाय घेण्यास सांगितलं आहे, असं सांगतानाच जे नियम आहेत त्यांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : आरटीपीसीआर सोबत रॅपिड अँटिजेन चाचणी करणार : राजेश टोपे

Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड

Coronavirus: राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण निर्बंध कडक करण्याचा विचार; अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.