AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेच्या जमिनी लाटल्या, मध्य-पश्चिम मार्गावर 7 हजार अवैधं बांधकामं!

अखिलेश तिवारी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरात होत असलेल्या अवैध बांधकामाबाबत एक आश्चर्यकारक आकडा समोर आला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या जागेत सात हजारहून अधिक अतिक्रमणं झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाला याची माहिती असूनही रेल्वेकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुंबईच्या जवळपास सर्वच रेल्वे […]

रेल्वेच्या जमिनी लाटल्या, मध्य-पश्चिम मार्गावर 7 हजार अवैधं बांधकामं!
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

अखिलेश तिवारी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरात होत असलेल्या अवैध बांधकामाबाबत एक आश्चर्यकारक आकडा समोर आला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या जागेत सात हजारहून अधिक अतिक्रमणं झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाला याची माहिती असूनही रेल्वेकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मुंबईच्या जवळपास सर्वच रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं दिसून येतं. फेरीवाले, पान-टपऱ्या, चहाची दुकानं इतकचं नाही तर कित्येक ठिकाणी अवैधरित्या बांधकाम करुन लोक राहात आहेत. रेल्वे विभागाला याची माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष का करत आहेत? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

रेल्वेचा नियम काय?

रेल्वे नियमानुसार रेल्वे परिसरात कुठल्याही प्रकारचं अवैध बांधकाम करणे कायद्याने गुन्हा आहे. रेल्वे अधिनियम 147 अंतर्गत अवैध बांधकामाच्या प्रकरणांत कारवाई करण्याची जबाबदारी आरपीएफ आणि अतिक्रमण विभागाची असते.

एका आरटीआयमध्ये यासंबधी प्रश्न उपस्थित करण्यात आले, तेव्हा रेल्वे परिसरात 7 हजार 500 हून अधिक अतिक्रम असल्याचं स्वतः रेल्वेने स्पष्ट केलं. रेल्वे परिसरात असलेल्या अतिक्रमणाची जी आकडेवारी समोर आली आहे, ती खरंच आश्चर्यकारक आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग:

भायखळा आणि सँडहर्स्ट रोड स्थानक – 1000

परेल रेल्वे स्थानक – 163

सायन आणि माटुंगा स्थानक – 1713

कुर्ला स्थानक आणि कारशेड – 625

विद्याविहार स्थानक – 25

विक्रोळी स्थानक – 150

कुर्ला टर्मिनस – 995

कोपरखैरणे आणि दिवा स्थानक – 368

वडाळा -किंग सर्कल स्थानक – 50-60

वाशी -मानखुर्द स्थानक – 48

पश्चिम रेल्वे मार्ग :

वांद्रे स्थानक – 550

जोगेश्वरी – गोरेगाव स्थानक – 240

मलाड – कांदिवली स्थानक – 289

कांदिवली – बोरीवली स्थानक – 132

बोरिवली – दहिसर स्थानक – 500

महत्वाचं म्हणजे या आकड्यांनंतरही रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी याचा दावा करत आहेत की, त्यांच्याकडून वेळोवेळी या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्यात आली. पण, आकडे बघता जर खरंच रेल्वे विभागातर्फे या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असेल, तर रेल्वे प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.

आरटीआयच्या या रिपोर्टमध्ये आणखी एक महत्वाची बाब समोर आली. जीआरपीचे कमिशनर निकेत कौशिक यांनी याच वर्षी मार्च महिन्यात अतिक्रमण हटविण्यासंबधी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या डीआरएमला पत्र पाठवले होते. या पत्रासोबत त्यांनी अतिक्रमणाचे काही फोटोही पाठवले. त्यांनी अतिक्रमण हटविण्याची विनंती करत, गरज असल्यास पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देण्याचेही म्हटले. मात्र 10 महिने उलटूनही रेल्वेतर्फे ना या पत्राचे उत्तर मिळाले ना कुठली कारवाई झाली.

रेल्वे परिसरात अवैधरित्या बांधकाम करून राहणाऱ्या या लोकांबद्दल रेल्वेकडे कुठलीही माहिती नाही. हे लोक कोण आहेत, कुठूनं आले आहेत, ते काय करतात यासंबंधी कुठलीही माहिती रेल्वे विभागाला नाही. त्यामुळे हे अतिशय धोक्याचे ठरू शकते. या अज्ञात लोकांकडून गंभीर गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.