IAF Father-Daughter : वडील आणि मुलीनं उडविलं फायटर जेट, वायुसेनेच्या इतिहासातील पहिली घटना

इंटरनेटवर हा फोटो व्हायरल झाला. ज्यात वडील व मुलीनं मिळून विमानाचं उड्डाण भरलं. एअर कमांडर संजय शर्मा आणि मुलगी अनन्या शर्मा यांनी कर्नाटकाच्या बिदार येथे हॉक -132 विमानाचं उड्डाण भरलं.

IAF Father-Daughter : वडील आणि मुलीनं उडविलं फायटर जेट, वायुसेनेच्या इतिहासातील पहिली घटना
वडील आणि मुलीनं उडविलं फायटर जेट
Image Credit source: twitter
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 05, 2022 | 7:37 PM

मुंबई : एअर कमांडर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी आपली मुलगी अनन्या शर्मा (Ananya Sharma) सोबत फायटर जेट उडविलं. भारतीय वायूसेनेत अशी घटना पहिल्यांदा घडली. फायटर जेट वडील व मुलीनं सोबत उडविलं. वायुसेनेच्या इतिहासात असा क्षण पहिल्यांदा आला. वायूसेनेत उड्डाण करणारी वडील व मुलीची ही पहिली जोडी ठरली. फ्लाईंग ऑफिसर अनन्यानं भारतीय वायू सेना स्टेशन बीदरमध्ये हॉक -132 विमानाचं इनफार्मेशन उड्डाण भरली. याठिकाणी अनन्या लढावू विमानात पदवी (Degree) प्राप्त करण्यापूर्वी प्रशिक्षण घेत होती. वायूसेनेत असा प्रसंग यापूर्वी कधी आला नव्हता. फायटर जेट विमान वडील व मुलीनं चालविलं.

उड्डाण भरण्यासाठी वडील-मुलगी सज्ज

इंटरनेटवर हा फोटो व्हायरल झाला. ज्यात वडील व मुलीनं मिळून विमानाचं उड्डाण भरलं. एअर कमांडर संजय शर्मा आणि मुलगी अनन्या शर्मा यांनी कर्नाटकाच्या बिदार येथे हॉक -132 विमानाचं उड्डाण भरलं. ही घटना 30 मे रोजी घडली. आयएएफनं प्रेस रिलीज केली. त्यानुसार, वडील आणि मुलीनं सोबत विमान उड्डाण पहिल्यांदा केल्याचं सांगितलंय. फोटोत एअर कमांडर शर्मा आणि त्यांच्या मुलीचं छायाचित्र विमानासमोर आहेत. त्या विमानाचं उड्डाण भरण्यासाठी ते सज्ज असल्याचं दिसतं.

हे छायाचित्र प्रेरणा देणारे

ट्वीटरवर हा फोटो हीट ठरला. हा फोटो प्रेरणा देणारा आहे. सेवानिवृत्त एअर मार्शल पी. के. रॉय यांनी या अचिव्हमेंटचं कौतुक केलंय. अशाप्रकारंचं दृष्य यापुंढ दिसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संजय शर्मा हे भारतीय वायूसेनेत 1989 पासून कार्यरत आहेत. फ्रंटलाईन फायटर स्टेशन म्हणूनही त्यांनी काम केलंय. मीग 21 चं फायटर ऑपरेशनही त्यांनी केलंय. अनन्या शर्मा या डिसेंबर 2021 पासून प्रशिक्षण घेत आहेत. फायटर वैमानिक म्हणून मुलींना सेवेत घेण्यात येणार आहे. अनन्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केलंय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें