5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात भिंत उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे.

5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात भिंत उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 5:26 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा बंगल्यावर आपत्कालिन आढावा बैठक आयोजित केली. राज्याचे मुख्य सचिव आपत्कालिन विभागाचे अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे एकाच गाडीतून वर्षा बंगल्यावर पोहोचले.

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा दुर्घटनाग्रस्त पाहणी दौरा 

मुख्यमंत्र्यांनी सलग तीन दिवस पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तुफान पावसाने हाहाकार माजवल्याने राज्याच्या अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, सातारा इथेही दरड दुर्घटना घडल्या. मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि चिपळूणचा दौरा केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री साताऱ्यातील कोयनानगरला जात होते. मात्र तुफान पावसामुळे हेलिकॉप्टर लँड होऊ शकत नसल्याने, मुख्यमंत्री परत पुण्याला आले. तिथून ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावर आपत्कालिन बैठक आयोजित केली.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर माघारी, कोयनानगरात खराब हवामान, उद्धव ठाकरे पुण्यातून मुंबईत

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.