AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरेमध्ये वारंवार आगी का लागतात?; शिवसेना नेत्याने केली चौकशीची मागणी

अग्निशमन दलाच्या अहवालानुसार आरेमध्ये वर्षभरात 27 वेळा आगी लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Aarey Colony Fire Cases Increase)

आरेमध्ये वारंवार आगी का लागतात?; शिवसेना नेत्याने केली चौकशीची मागणी
Aarey Colony Fire
| Updated on: Mar 27, 2021 | 4:17 PM
Share

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये आरेमध्ये अचानक आगी लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर या घटनांची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी केली आहे. त्याशिवाय या आगीच्या घटनांनतर त्या ठिकाणी सद्यस्थिती काय? याची माहिती घेण्यात यावी, असेही रविंद्र वायकर म्हणाले. (Aarey Colony Fire Cases Increase ravindra waikar demand to inquiry)

जंगले नष्ट करण्याचा प्रकार

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व या ठिकाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून 15 मार्चपर्यंत जवळपास 15 हून अधिक आग लागण्याचे प्रकार घडले आहे. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार आरेमध्ये वर्षभरात 27 वेळा आगी लागल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आरेमध्ये आकस्मित आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे येथील पर्यावरणाची हानी होत आहे. यामुळे जंगले नष्ट करण्याचा हा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी आगी लागतात की लावल्या जातात? असा प्रश्न वायकरांनी केला आहे.

आरे प्रशासनाने सखोल चौकशी करावी

तसेच ही जागा बळकावण्याच्या प्रयत्न होतो. त्यामुळे याची सखोल चौकशी आरे प्रशासनाकडून करण्यात यावी. जर यात कोणी दोषी सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

आरेमध्येच चित्रनगरी असल्याने चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी उभारलेले अनेक सेट्‌स शुटींग संपल्यानंतर सेट्‌स काढून आरेच्या परिसरातच टाकले जातात, असे ही निदर्शनास येत आहे. आरेच्या ज्या ज्या भागांमध्ये अचानक आगी लागल्या आहेत. त्या भागाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती आरे प्रशासनाने घ्यावी.

आरेमधील अग्निशमन केंद्र पुन्हा सुरु करावे 

आरेमधील 800 एकर जागा महाराष्ट्र शासनाने जंगल म्हणून घोषित केली आहे. मात्र या वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी अग्नी व्यवस्थापन योजना राबविणे ही तेवढेच महत्वाचे आहे. यामुळे सुरुवातीस आरेमध्ये अग्निशमन केंद्र होते. ते पुन्हा सुविधांसहित सुरू करण्यात यावे. त्यामुळे या ठिकाणी अचानक लागणार्‍या आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य होईल, तसेच जंगलाची हानी होणार नाही, असे रविंद्र वायकरांनी पत्रात नमूद केले आहे. (Aarey Colony Fire Cases Increase ravindra waikar demand to inquiry)

संबंधित बातम्या : 

कोरोनाला थोपवण्यासाठी फडणवीसांचा नवा फॉर्म्यूला , ‘या’ त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा राज्य सरकारला सल्ला

मुंबई महापालिकेत तब्बल 38 हजार पद रिक्त, आरटीआय कार्यकर्त्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.