AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Ghosalkar | मॉरिस नरोन्हा याची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत, पुप्षा चित्रपटातील डॉयलॉग…

Abhishek Ghosalkar Shot Dead | मुंबईतील दहीसरमध्ये अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई सोबतच फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर मॉरिस भाई याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. आता मॉरिस नरोन्हा याची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे.

Abhishek Ghosalkar | मॉरिस नरोन्हा याची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत, पुप्षा चित्रपटातील डॉयलॉग...
Updated on: Feb 10, 2024 | 7:55 AM
Share

मुंबई, दि. 10 फेब्रुवारी 2024 | शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकावर अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी मुंबईतील दहिसरमध्ये हत्या झाली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर अचनाक मॉरिस याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. आता या प्रकरणात मॉरिस नरोन्हा याची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये पुप्षा चित्रपटातील डॉयलॉग वापरण्यात आला आहे. यामुळे या पोस्टचे संकेत कोणासाठी होते, ही चर्चाही रंगली आहे.

काय होती पोस्ट

मॉरिस याच्या इन्सटाग्रामवर अकाउंटवर दहा दिवसांपूर्वी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग देत एक पोस्ट टाकली गेली आहे. त्यात मॉरिस याचा फोटो आणि ऑडिया क्लिप आहे. त्यात म्हटले आहे की, पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझी क्या? फायर हूँ मै… ही पोस्ट चर्चेत आली आहे. मॉरिस याने या चित्रपटातील डॉयलॉग वापर स्वत:ला फायर म्हटले आहे. यामुळे दहा दिवसांपूर्वीच त्याने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा कट रचला की काय? ही चर्चा सुरु झाली आहे.

पिस्तूल कोणाकडून मिळाले

मॉरिस याने फेसबूक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्याने मॉरिसने सुरक्षा रक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्रा यांची बंदूक मिळवली होती. मिश्रा यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून पिस्तूलचा परवाना मिळवला होता. परंतु त्याची नोंद केली नाही. यामुळे मिश्रा यांनाही अटक करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी मॉरसने मिश्रा याला त्याचा पीए मेहुल पारखे सोबत पाठवून दिले होते.

View this post on Instagram

A post shared by Mauris Noronha (@maurisbhai)

अभिषेकला सोडणार नाही

अभिषेक घोसाळकर याला सोडणार नाही, त्याला संपवणार आहे, असे मॉरिस सातत्याने बोलत होता. त्याच्या पत्नीने ही माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु आहे. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात तब्बल साडेसात तास पंचनामा, अभिषेक घोसाळकर यांच्या शरीरात मिळाल्या दोन गोळ्या

शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!
शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!.
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी.
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत.
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत.
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक.
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर.
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले.
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान.
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...