AC Local Train : एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पॅटर्नचा अभ्यास सुरू, जाणून घ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप

Mumbai Railway : मुंबई रेल्वे विकास महामंडळ प्रवाशांचा आर्थिक स्तर आणि खर्च करण्याची ऐपत पुन्हा तपासून पाहत आहे. सध्या सुरू असलेल्या एसी लोकलच्या वापराबाबत प्रवाशांना एक प्रश्न मालिका देण्यात आली असून त्यामध्ये त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत.

AC Local Train : एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पॅटर्नचा अभ्यास सुरू,  जाणून घ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 8:26 AM

मुंबई – मुंबई (Mumbai) एसी लोकल (AC  local) ट्रेनच्या सिंगल तिकिटाचे भाडे कमी केल्यानंतर रेल्वेने आणखी त्याचवेळी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावर एसी लोकल गाड्यांच्या सेवेत वाढ करण्यात आली. एसी लोकल ट्रेनची सेवा वाढवण्यामागील मुख्य कारण म्हणजे कडक उन्हात प्रवाशांची वाढती मागणी होती. प्रत्यक्षात 5 मेपासून भाडे कमी केल्यानंतर एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली. सीएसएमटी-कल्याण-टिटवाळा-बदलापूर या मुख्य मार्गावरील सेवा वाढविण्याची प्रवाशांची मागणी होती. ती रेल्वे प्रशासनाने लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाड्या मुख्य मार्गावर हलवून सेवा वाढवली.

प्रवाशांचा पॅटर्न शोधण्यासाठी रेल्वेकडून प्रशासनाकडून नवी प्रक्रिया

मुंबई रेल्वे विकास महामंडळ प्रवाशांचा आर्थिक स्तर आणि खर्च करण्याची ऐपत पुन्हा तपासून पाहत आहे. सध्या सुरू असलेल्या एसी लोकलच्या वापराबाबत प्रवाशांना एक प्रश्न मालिका देण्यात आली असून त्यामध्ये त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उत्तरात चार पर्याय देण्यात आले आहेत. प्रवाशांचा पॅटर्न शोधण्यासाठी रेल्वेकडून प्रशासनाकडून नवी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या एसी लोकलमध्ये काय प्रवाशांना बदल हवेत का ? यापूर्वी तुम्ही कशा पद्धतीने प्रवास करीत होता. कोणत्या क्लासचे तिकीट काढायचा, दिवसातून कितीवेळा प्रवास करता, तुमचे मासिक उत्पन्न किती आहे ? अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

सेवा 44 वरून 56 पर्यंत वाढल्या

या वाढीनंतर आता सीएसएमटी-कल्याण-टिटवाळा-बदलापूर दरम्यानच्या एसी लोकल सेवेची संख्या 44 वरून 56 झाली आहे. एवढेच नाही तर रविवारी आणि जाहीर केलेल्या सुट्टीच्या दिवशीही एसी लोकलच्या 14 सेवा या ट्रॅकवर धावत आहेत. भाडे कमी करण्यात आल्यामुळे प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. संख्या वाढल्यानंतर एसी लोकलची सेवा वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत होती.

हे सुद्धा वाचा

हे लक्षात घेऊन सेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवा वाढल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर झाला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.