Navnath Ban: रोहित पवार यांचा मफलर मॅननंतर SIR ऑडिओ बॉम्ब, भाजपमधून पहिली तिखट प्रतिक्रिया, अर्धवटराव म्हणत…

Navnath Ban on Rohit Pawar: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मफलर मॅननंतर राज्य सरकारवर मतचोरीचा आरोप केला आहे. त्यांनी SIR विषयीची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यावर आता भाजपमधून पहिली तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे.

Navnath Ban: रोहित पवार यांचा मफलर मॅननंतर SIR ऑडिओ बॉम्ब, भाजपमधून पहिली तिखट प्रतिक्रिया, अर्धवटराव म्हणत...
रोहित पवार यांचा SIR ऑडिओ बॉम्ब, भाजपमधून पहिली तिखट प्रतिक्रिया
| Updated on: Nov 20, 2026 | 6:36 AM

Navnath Ban on Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर मतचोरीचा बॉम्ब टाकला आहे. त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने नावं वगळल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतदारांची नावं खोटे अर्ज करून कमी करून घेतल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला. रडीचा डाव खेळून भाजपने सत्ता मिळवल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. त्यावर आता भाजपमधून पहिली तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार दिशाभूल करत आहेत

Loading...

रोहित पवार ऑडिओ क्लिप ऐकवुन SIR प्रकरणात लोकांची दिशाभूल करत आहे. SIR मध्ये कोणाचाही नाव कापता येत नाही. 2002 च्या मतदार यादीतला पुरावा असेल तर कुणाचंही नाव वगळता येत नाही. त्यामुळे कोणी अर्ज दिला काहीही केलं तरी मतदारांना अपात्र करण्याचा अधिकार नाही तो अधिकार कोणाकडे नाही हे रोहित पवारांनी आधी समजून घेतलं पाहिजे. ज्यांचं मतदार दुबार आहे जे मयत झालेले आहेत जे स्थलांतरित आहेत अशाच लोकांची यावं मतदार यादीतून वगळले जातात. रोहित पवारांना एसआयआरची प्रक्रिया समजून घ्यायची नाहीये आणि अशी एखादी ऑडिओ क्लिप सादर करून लोकांची दिशाभूल करायची आहे, असा आरोप नवनाथ बन यांनी केला.

मतदारांना नाव नोंदवण्याची संधी

असे एखादे नाव वगळलं गेलं असेल तर फॉर्म 6 भरून पुन्हा एकदा त्यांचं नाव मतदार यादीत समावेश करता येतं. निवडणूक आयोगाने पात्र मतदारांना मतदार यादी मध्ये सामावून घेण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्यात. कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीने ठरवलं तरीही अशा पद्धतीने कोणाचे नाव वगळले जाऊ शकत नाही. हे रोहित पवारांनी नौटंकी करण्याच्या आधी समजून घेतलं पाहिजे. अन्यथा नेहमी अर्धवट माहितीच्या आधारे अर्धवटराव रोहित पवार अशी जनतेची दिशाभूल करत राहतील, अशी तिखट प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us