AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर यांनी काडीमोड घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या मुंडावळ्या; राऊतांची प्रतिक्रिया काय

Sanjay Raut : वंचित बहजन आघाडीने बुधवारी महाविकास आघाडीशी काडीमोड घेत, त्यांच्या उमेदवारांची यादीच जाहीर केली. वंचितने राजकारणातील नवीन वळण घेतले. अर्थात त्याची कुणकुण अगोदरच होती. भाजपाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असा आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काडीमोड घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या मुंडावळ्या; राऊतांची प्रतिक्रिया काय
अजूनही बोलणी सुरु, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया
| Updated on: Mar 28, 2024 | 12:15 PM
Share

वंचितच्या नवीन राजकीय वळणाची कुणकुण खरी ठरली. महाविकास आघाडीत आपला योग्य सन्मान होत नसल्याची रुखरुखीमुळे प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी वाट चोखंदळली. बुधवारी, त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांची नावे जाहीर केली. हा एक प्रकारे महाविकास आघाडीला इशाराच होता. पण काही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी सामंजस्याची भूमिका दाखवल्याचे पण दिसून आले. आता खासदार संजय राऊत यांची या घडामोडींवर प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना भाजपाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा होईल असे कोणतेही पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. काय म्हणाले संजय राऊत?

आंबेडकरांशी चर्चा सुरु

पहिल्या टप्यातील काही जागा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्या आहेत. आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आणखी चर्चा करत आहोत. भाजपाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा होईल असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. संविधान वाचविण्याची ही लढाई आहे . हुकूमशाही विरोधात ही लढाई आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहभागा शिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडीची बैठक

आज महाविकास आघाडीच्या कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना प्रमुख नेत्यांची बैठक होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता जागा वाटपाचा तिढा संपला आहे. आजच्या बैठकीत आम्ही 5 टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचे नियोजन करणार आहोत.सभा कुठे घ्यायच्या, प्रचार कसा करायचा, शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते यांच्या एकत्र सभा कुठे घ्यायच्या, प्रचार यंत्रणांचे साहित्य यावर आज चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यकर्त्यांना केले आवाहन

महाविकास आघाडीच्या बाबतीत काही कटूतेने बोलायचं नाही. जरी सांगलीतल्या बाबतीत काही लोकांनी भूमिका स्पष्ट केले असतील तरी यावर कोणीही कटू मत व्यक्त करायचं नाही, अशा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काही नेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना असतात काही कार्यकर्ते मत व्यक्त करतात. अशाच प्रकारच्या भावना अमरावती, रामटेक या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही. आघाडीही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते. सांगलीची जागा जर आम्ही एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशाल चिन्हावर आम्ही जिंकणार. पण काही व्यक्तिगत कारणामुळे काही व्यक्तिगत अडचणीमुळे कुणाला जर भाजपाला मदत करण्यासाठी काही वेगळं घडवायचा असेल तर ते शिवसेना होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.