AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airoli Vidhan Sabha: ऐरोलीमध्ये गुरु अन् शिष्य यांच्यात लढत, कोण मारणार बाजी?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे असणाऱ्या हा मतदार संघ भाजपने आपल्याकडे खेचून आणला. पक्षाचे गणेश नाईक 1,14,645 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश रघू शिंदे यांना 78,491 मते मिळाली. त्यापूर्वी 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे संदीप गणेश नाईक विजयी झाले होते.

Airoli Vidhan Sabha: ऐरोलीमध्ये गुरु अन् शिष्य यांच्यात लढत, कोण मारणार बाजी?
Airoli Vidhan Sabha
| Updated on: Oct 30, 2024 | 3:00 PM
Share

मुंबईतील लक्षणीय लढत म्हणून ऐरोलीचा उल्लेख आहे. या ठिकाणी भाजपने गणेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आतापर्यंत चार वेळा बेलापूरचे तर एकवेळा ऐरोलीचे प्रतिनिधित्व केले आहे. ते तीन वेळा मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. आघाडीकडून लढणारे एम.के.मढवी चार वेळा नगरसेवक होते. त्यांची पत्नी तीन वेळा तर मुलगा एक वेळा नगरसेवक झाला आहे. १५ वर्षे ते नाईक यांचे कट्टर समर्थक होते. ऐरोलीमध्ये 22 उमेदवारांनी 26 अर्ज दाखल केले आहे. यामध्ये गणेश नाईक यांनी तीन अर्ज दाखल केले आहे. संजीव नाईक यांनी दोन अर्ज दाखल केले आहे.

ऐरोलीमध्ये भाजपच्या गणेश नाईक यांच्याविरोधात उद्धवसेनेचे एम.के.मढवी व शिंदे सेनेचे विजय चौगुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दोघेही एकेकाळी नाईक यांचे कट्टर समर्थक होते. युतीधर्म पाळत चौगुले यांनी माघार घेतली तर गुरु-शिष्य यांच्यात लढत होणार आहे.

असा आहे मतदार संघ

ठाणे लोकसभा मतदारसंघाचा ऐरोली हा विधानसभा मतदारसंघ भाग आहे. ऐरोलीचा इतिहास पहिल्यास बेलापूर विधानसभा मतदार संघाचे विभाजन होऊन नवी मुंबईत ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा अस्तित्वात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 ते 4, 8 ते 9, 27 ते 42 आणि 61 यांचा या मतदार संघात समावेश होतो. 2011 च्या जनगणनेप्रमाणे या मतदार संघात 42 हजार 531 एससी 9.5 टक्के मतदार आहेत. एसटी मतदारांची संख्या 7,924 म्हणजे 1.77 टक्के आहे. 26,862 मुस्लिम मतदार आहेत. मुस्लिम मतदारांची टक्केवारी 6% आहे. ऐरोली विधासभा मतदार संघ हा मध्यमवर्गीयांचा मतदार संघ आहे. परंतु या भागात झोपडपट्टीवासीय लक्षणीय आहे. मनपात 57 नगरसेवकांपैकी जवळपास 20 नगरसेवक हे झोपडपट्टी बहुल भागातून निवडून येतात.

2019 मध्ये अशी लढत झाली

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे असणाऱ्या हा मतदार संघ भाजपने आपल्याकडे खेचून आणला. पक्षाचे गणेश नाईक 1,14,645 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश रघू शिंदे यांना 78,491 मते मिळाली. त्यापूर्वी 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे संदीप गणेश नाईक विजयी झाले होते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.