AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : विधानसभेतले विरोधीपक्ष नेते अजित पवार? राष्ट्रवादीच्या आमदारांचा आग्रह, लवकरच होणार निर्णय

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र दिले आहे. आता या सर्व आमदारांच्या मागणीनुसार अजित पवार यांचे नाव विरोधीपक्ष नेतेपदासाठी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar : विधानसभेतले विरोधीपक्ष नेते अजित पवार? राष्ट्रवादीच्या आमदारांचा आग्रह, लवकरच होणार निर्णय
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 03, 2022 | 9:52 PM
Share

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपद (Opposition leader) घ्यावे, असा आग्रह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी केला आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र दिले आहे. आता या सर्व आमदारांच्या मागणीनुसार अजित पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदारांची बैठक घेतली. यात वरिष्ठ नेतेदेखील होते. या बैठकीत प्रामुख्याने विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदासाठीचा उमेदवार ठरवण्यात येणार होता. यात सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) होते. त्यानंतर जयंत पाटील यांच्या नावाचीदेखील चर्चा झाली. मात्र अनेक आमदार अजित पवार यांना विरोधीपक्ष नेता करावे, या मताचे असल्याचे दिसून आले. तसे पत्रही त्यांनी शरद पवार यांना दिले आहे.

विधीमंडळाच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव

अजित पवार यांना जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. सरकारमध्ये असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यांचा, कामाचा आणि भाषणांचा बोलबाला राहिला. अजित पवारांचे आजचे विधानसभेतले भाषणही चांगलेच गाजले. अजित पवारांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे. सरकारला घाम फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात असल्याचे अनेक आमदारांचे मत आहे. तसेच विविध खात्यांच्या कामांचा अनुभव हा अजित पवारांच्या कामी नक्कीच येणार आहे. अजित पवारांची शिस्त, आपल्याच कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावणे अशी आक्रमकतादेखील त्यांच्यात आहे. या सर्व बाबी पाहता त्यांचा धडाडीपणा आणि अनुभव पाहून त्यांना विरोधीपक्ष नेतेपदाची माळ पडणार असल्याचे बोलले जात आहे.

चर्चेतील आणखी एक नाव

अजित पवार यांच्यानंतर सर्वाच चर्चेतील नाव म्हणजे जयंत पाटील. विरोधीपक्ष नेते निवडीची जबाबदारी शरद पवारांनी चार नेत्यांवर सोपवली आहे. विरोधीपक्ष नेते पदासाठी अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे यांनी एकत्र बसून नाव निश्चित करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत नाव निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी