AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, किती दिवस सहन करायचं : अजित पवार

आपण दुकानावर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला तर कुणीतरी मराठी द्वेष्टे महाभाग न्यायालयात गेले. मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, किती दिवस सहन करायचं. अरे बाबांनो मराठी भाषेवर प्रेम करा, असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, किती दिवस सहन करायचं : अजित पवार
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं संबोधनImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 9:31 PM
Share

मुंबई: मराठी (Marathi) भाषा दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अजित पवार यांनी या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात मराठीच्या अनुषंगानं भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी मराठी भाषेविरोधात न्यायालयात जाणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. अजित पवार यांनी आपण दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याचा निर्णय घेतल्यावर काही महाभाग मराठीद्वेष्टे न्यायालयात गेले. त्यांना न्यायालयानं सुनावलं आहे. मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. किती दिवस सहन करायचं, असं अजित पवार म्हणाले. पुस्तकांचं गाव प्रत्येक विभागात सुरु करत आहोत. पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचं गाव तयार करण्याची भूमिका आहे. मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. मराठीची उपयुक्तत्ता वाढवली पाहिजे यासाठी प्रयत्न चालवला आहे,मराठी भाषेची उपयुक्तता वाढवल्याशिवाय आपणही गप्प बसणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

मराठी भाषा दिन लोकांचा कार्यक्रम व्हावा

मराठी भाषेचा गोडवा, मराठी भाषेचं सौदर्य, मराठीचा इतिहास, पोवाडे, नाटक, शाहिरी, काव्य वाचन, लावणी, एकपात्री, लोकनाट्य, तमाशा, नाटक यांचं सादरीकरण शक्य झाल्यास परदेशातही व्हावं, असं वाटतं. यामुळं मराठी भाषेचं वैभव अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. मराठी भाषा दिवस साजरा करत असताना विविध क्षेत्रातील लोकांना सहभागी करुन घेतला पाहिजे. मराठी भाषिक इंजिनिअर्स, डॉक्टर्स, नाट्य कलावंत, लोक कलावंत, चित्रपट कलावंत यांचा सहभाग वाढवला पाहिजे. हा कार्यक्रम शासकीय न राहता लोकांचा झाला पाहिजे.

भाषा बोलणाऱ्याचं पोट भरण्याचं सामर्थ्य त्या भाषेत असावं

कोणती भाषा ओठातून येऊन उपयोग नाही तर ती पोठातून आली पाहिजे. कोणती भाषा टिकवायची असेल तर ती भाषा बोलणाराचं पोट भरण्याचं सामर्थ्य त्या भाषेत असावं. त्यासाठी भाषा रोजगाराची, आणि उद्योगाची व्हायला हवी. जपान, चीन, जर्मनी आणि फ्रान्समध्ये व्यवहार त्यांच्या भाषेत चालतात. आपल्याकडे व्यवहार इंग्रंजी हिच ज्ञान भाषा मानली गेली पण हे अर्धसत्य आहे. कोणत्याही समाजावर देशावर हल्ला केला जातो. इंग्रजांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला केला. इतर भाषिक दोन व्यक्ती भेटल्यास ते आपल्या मातृभाषेत बोलतात. मात्र, मराठी भाषिक लोक भेटल्यानंतर तुम्हीच सांगा ते कोणत्या भाषेतून बोलतात. एक तर इंग्रजीत बोलतात किंवा हिंदीत बोलतात. अन आपल्या भाषेबद्दल आपल्या मनात न्यूनगंड असला तर भाषेचा विकास कसा होईल.

सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या पाठिशी राहणार

धावपळीच्या युगात कुटुंब लहान होत आहेत. आजी आजोबांचा सहवास नवीन पिढीला कमी मिळतोय.इंग्रजी भाषा ही संधी देणारी हा संभ्रम दूर करावा लागेल. मराठी देवनागरीतून व्यक्त होते. केवळ एकमेकांशी मराठीत बोलल्यानं मराठी भाषेचं संवर्धन होईल, या भाबड्या आशेतून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. सरकारवर केवळ अवलंबून न राहता लोकांनी पुढं आलं पाहिजे. मराठी साहित्य, मराठी नाटक, सिनेमा निश्चित चांगले प्रयत्न करतात. साहित्य महोत्सवापेक्षा खाद्य महोत्सवामध्ये गर्दी का जास्त असते याचा विचार करावा लागेल. स्टोरी टेल सारख्या संकल्पना आपल्याला स्वीकाराव्या लागतील, असं माझं मत आहे. सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या पाठिशी ठाम पणे उभ राहणार आहोत. मराठी भाषा संवर्धन, प्रचार, प्रसारासाठी मुंबईत लवकरच मराठी भाषा भवन अस्तित्त्वात येईल, असं अजित पवार म्हणाले.

काही महाभाग मराठीद्वेष्टे न्यायालयात गेले

आपण दुकानावर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला तर कुणीतरी मराठी द्वेष्टे महाभाग न्यायालयात गेले. दुकानावर मराठी पाट्या लावाव्यात,स्थानिक भाषा सोईची असती, असं मराठी द्वेष्ट्यांना न्यायालयानं सुनावलं. त्यांना एकचं सांगणं आहे, आमच्या मराठी भाषेला, विरोध कशाला करता. तुम्ही तुमचं घर, जिल्हा आणि राज्य सोडता. पोटाची खळगी भरण्यासाठी इथं येता आणि मराठीचा द्वेष करायचा हे बरं नव्हं, मराठी मनाचा, संवेदनशीलतेचा अंत पाहू नका. मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, किती दिवस सहन करायचं. अरे बाबांनो मराठी भाषेवर प्रेम करा, असं अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या :

‘पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन’ , रशिया-युक्रेना युद्धावर “आठवले” म्हणून पाठवले…

IPL 2022 आधी CSK ची मोठी घोषणा, युवा क्रिकेटपटूंसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.