AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 आधी CSK ची मोठी घोषणा, युवा क्रिकेटपटूंसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

मागच्या 14 वर्षात IPL मध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळणाऱ्या खेळाडूंनी प्रदर्शनाच्या आधारावर भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. IPL मुळे अनेक क्रिकेटपटूंच नशीब पालटलं आहे.

IPL 2022 आधी CSK ची मोठी घोषणा, युवा क्रिकेटपटूंसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल
Image Credit source: Image Credit Source: CSK
| Updated on: Feb 27, 2022 | 8:27 PM
Share

चेन्नई: मागच्या 14 वर्षात IPL मध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळणाऱ्या खेळाडूंनी प्रदर्शनाच्या आधारावर भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. IPL मुळे अनेक क्रिकेटपटूंच नशीब पालटलं आहे. आता काही फ्रेंचायजी क्रिकेटच्या पायाभूत विकासावर भर देत आहेत. आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आता त्या दिशेने पाऊल उचललं आहे. सीएसके लवकरच आपली क्रिकेट अकादमी (Chennai Super Kings Academy) सुरु करणार आहे. या अकादामीच्या माध्यमातून लहान वयातच मुला-मुलींमधील क्रिकेट प्रतिभेला योग्य दिशा देता येईल. अकादमीच पहिलं सेशन एप्रिल 2022 मध्ये सुरु होणार आहे.

फ्रेंचायजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी रविवारी ही माहिती दिली. “आम्ही मागच्या पाच दशकापासून क्रिकेटशी जोडलेलो आहोत. अकादमी हे क्रिकेटसाठी काहीतरी करण्याच्या दिशेने उचलेलं एक पाऊल आहे. आमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून आम्ही पुढच्या पीढीसोबत आमचे अनुभव शेअर करु. त्यांना तयार करता येईल” असं प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.

चेन्नई आणि सेलममध्ये जागतिक स्तराची अकादमी

सीएसकेची मालकी इंडिया सिमेंटसकडे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंटसचे मालक आहेत. चेन्नई आणि सेमल येथे सीएसकेची अकादमी सुरु होईल. चेन्नईत थोरईपक्कम भागात ही अकादमी सुरु होईल. इथे क्रिकेटच्या दृष्टीने सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. टर्फ पीच तसेच इनडोर, आऊटडोर नेट असेल. फ्लडलाइट्सची सुद्धा व्यवस्था असेल

सलामीचा सामना CSK-KKR मध्ये

आयपीएल 2022 साठीचा महालिलाव दोन आठवड्यांपूर्वी पार पडला. आता प्रेक्षकांसह सर्व क्रिकेटपटूंना स्पर्धेचे वेध लागले आहेत. आजपासून बरोबर एक महिन्याने स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाचं उद्घाटन होईल. आयपीएल 2022 मधला पहिला सामना 26 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स रायडर्स (हे आयपीएलच्या 15 व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात भिडतील.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.