IPL 2022 Opening Match मध्ये CSK-KKR भिडणार, स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी?

आयपीएल 2022 साठीचा महालिलाव दोन आठवड्यांपूर्वी पार पडला. आता प्रेक्षकांसह सर्व क्रिकेटपटूंना स्पर्धेचे वेध लागले आहेत. आजपासून बरोबर एक महिन्याने स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाचं उद्घाटन होईल. आयपीएल 2022 मधला पहिला सामना 26 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

IPL 2022 Opening Match मध्ये CSK-KKR भिडणार, स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी?
IPL 2022
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 3:20 PM

मुंबई : आयपीएल 2022 साठीचा महालिलाव दोन आठवड्यांपूर्वी पार पडला. आता प्रेक्षकांसह सर्व क्रिकेटपटूंना स्पर्धेचे वेध लागले आहेत. आजपासून बरोबर एक महिन्याने स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाचं उद्घाटन होईल. आयपीएल 2022 मधला पहिला सामना 26 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) हे आयपीएलच्या 15 व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात (IPL 2022 Opening Match) भिडतील. चेन्नई सुपरकिंग्स हा संघ सध्या गतविजेता आहे. आत्तापर्यंत असे दिसून आले आहे की, आयपीएलचा पहिला सामना खेळण्याची संधी नेहमीच गतविजेत्या संघाला मिळते. त्यामुळे CSK ची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स हा संघ गतवर्षी उपविजेता ठरला होता. हा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) पहिल्या सामन्यात चेन्नईशी दोन हात करणार आहे. यावेळी आयपीएलचे लीग स्टेजचे सामने मुंबई आणि पुण्यातच खेळवले जाणार आहेत. आयपीएल 2022 मध्ये 10 संघ आहेत आणि ते प्रत्येकी पाचच्या दोन गटात विभागले गेले आहेत. सर्व संघ आपापसात किमान एक सामना नक्कीच खेळतील.

इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसने लिहिले आहे की, आयपीएल 2022 च्या सामन्यांदरम्यान, संघांना हॉटेलमधून सामने खेळताना आणि सरावासाठी जाताना रहदारीचा सामना करावा लागणार नाही. संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 55 सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. बीसीसीआयने सराव सुविधांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली आहे.

महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला मदत करणार

महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला आयपीएल सामने आणि प्रशिक्षणाबाबत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याअंतर्गत संघांना स्वतंत्र रोड लेन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एमसीएच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर म्हणाले की, बीसीसीआयसोबत 26 फेब्रुवारीला बैठक झाली होती. यावेळी महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. नार्वेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा देईल. मैदानात प्रेक्षकांच्या येण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील.

25 टक्के प्रेक्षकांना मैदानात परवानगी?

महाराष्ट्र सरकार आयपीएल सामन्यांसाठी 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात परवानगी देऊ शकते, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्याचवेळी बीसीसीआयने दोन संघांना एकाच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी 10 संघ असल्याने संघांसाठी पाच पंचतारांकित हॉटेल्स बुक करावी लागणार आहेत. राज्य सरकार स्पर्धेतील बायो बबल आणि कोविड टेस्टिंगमध्ये मंडळाला मदत करेल.

महाराष्ट्राचे क्रीडामंत्री म्हणाले..

येत्या 26 फेब्रुवारीपासून IPL चे सामने सुरु होणार आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. मुक्त वातावरण आहे. आयपीएल सामने ज्यावेळी होतील, त्यावेळी सर्व प्रेक्षकांना स्टेडियमवर परवानगी देता येईल, असे वातावरण असावे, अशी अपेक्षा सुनील केदार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

इतर बातम्या

IND vs SL: रोहित शर्माचा जगभरात डंका, पण श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर मैदानात उभं राहणं अवघड, 26 चेंडूत 5 वेळा बाद

IND vs SL: श्रेयस अय्यर-जाडेजाने लंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट

IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.