AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच ‘पॅकेज’, नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ

Akshya Tritiya Nandurbar Saalgadi: जर कामगार, सालदार, शेतगडी ठेवायचा तर आपण एक करार करतो. शेतातील वाटा अथवा वर्षाचे पैसे, कपडालत्ता दिल्या जातो. पण या जिल्ह्यात अनोखीच प्रथा आहे. इथं सालदार निवडीसाठी वेगळीच कसोटी आहे. तरच सालदार मालदार होतो.

Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच 'पॅकेज', नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ
सव्वा मण उचला दगड, व्हा मालामालImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 2:43 PM
Share

Nandurbar Unique Tradition: अक्षय तृतीयेनिमित्त सगळीकडं उत्साहाचं वातावरण आहे. अनेक मंदिरं आंब्यांची आरस करून सजवली आहेत. आज अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यात येते. त्यामुळे ती अक्षय, नष्ट न होणारी राहते, अशी मान्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतात सालगडी, सालदार, शेतगडी नेमला जातो. त्यासाठी वर्षभराचा करार करण्यात येतो. शेतातील धान्याचा वाटा, काही पैसे अथवा मोठी रक्कम, कपडेलत्ते असा हा करार असतो. त्याचवेळी नंदुरबारमध्ये एक अनोखी प्रथा, परंपरा जपली आहे. येथे सालगडी होण्यासाठी मोठी कसोटी द्यावी लागते. त्यात पास होणाऱ्याला सालदारच नाही तर मालदार होता येते.

90 किलोचा उचला दगड, व्हा मालदार

शेतात सालगडी म्हणून निवडीसाठी नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात सव्वा मण म्हणजे 90 किलोचा दगड उचलावा लागतो. वर्षांनुवर्षे ही परंपरा जपली गेली आहे. जो सालगडी, सालदार, शेतगडी सर्वात वजनदार दगड उचलेल त्याला तसाच दमदार दाम मोजून दिला जातो. त्याला सर्वाधिक रक्कम मिळते. ज्याला दगड उचलता आला नाही. त्यालाही शेतात काम मिळते. पण त्याला मोठी रक्कम दिली जात नाही. या अनोख्या परंपरेसाठी आणि सालगडी होण्यासाठी अनेक तरुण मेहनतीवर आणि आहारावर जोर देतात. अनेक जण सव्वा मण मोठा गोटा सहज उचलतात.

वर्षाभराचे ठरते पॅकेज

आजच्या AI च्या युगात कंपन्या कर्मचारी नियुक्तीसाठी अनेक सोपस्कार पार पडतात. त्यानंतर वर्षभराचे पॅकेज ठरवतात. त्यासोबत कर्मचाऱ्यांना काही सवलती आणि विशेष पॅकेजही दिल्या जाते. अगदी तसेच शेतीच्या कामासाठी सालदार नेमताना ही कसोटी पूर्ण करावी लागते. सालदाराने शेतात काम करण्याअगोदर त्याची ताकद आणि निग्रह जोखला जातो. त्यासाठी त्याला सर्वांसमक्ष अक्षय तृतीयेच्या मानाच्या दिवशी हा सव्वा मण दगड उचलावा लागतो. खानदेशात अक्षय़ तृतीयेला अनेक ठिकाणी ही परंपरा पाळली जाते. माळीवाड्यात वर्षानुवर्षे ही परंपरा जपली गेली आहे. आजही काही सालगड्यांनी ही कसोटी सहज पूर्ण केली. ताकद आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मोठा दगड उचलून खांद्यावर घेतला.

60 हजार ते 1 लाखांहून अधिक पॅकेज

शेतगड्याची निवड करताना त्याची ताकद, चिकाटी आणि काम करण्याची क्षमता याची अनोख्या पद्धतीने चाचणी घेतली जाते. यावर्षी सालदारांचे पॅकेज साधारणपणे 60 हजार ते 1 लाख 10 हजार आणि त्यापेक्षाही अधिक आहे. वर्षाला कपड्याचे दोन जोड आणि काही धान्य देण्याची तरतूदही या पॅकेजमध्ये असते. तसेच त्याला सुट्टी आणि महत्त्वाच्या कामाच्यावेळी बाहेरगावी जाण्याची मुभा मिळते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...