Ambarnath Crime: दिवसढवळ्या दोघा सख्ख्या भावांवर गोळीबार; एक ठार दुसरा गंभीर; व्यावसायिक वादातून हत्या

मागील काही दिवसांपासून गुंजाळ बंधू आणि त्यांच्या विरोधकांमध्ये नेहमीच वाद होत होते. त्यांचे हे वाद अगदी पोलीस स्टेशनपर्यंतही गेले होते, ज्यावेळी शिवाजीनगर पोलिसात गुंजाळ बंधू आणि त्यांच्या विरोधकांना ज्यावेळी बोलवून घेण्यात आले होते, त्यावेळी पोलिसांसमोरच मारामारीही झाली होती.

Ambarnath Crime: दिवसढवळ्या दोघा सख्ख्या भावांवर गोळीबार; एक ठार दुसरा गंभीर; व्यावसायिक वादातून हत्या
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 4:13 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये आज दिवसढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी व्यावसायिकतेच्या वादातून गोळीबार झाल्याने अंबरनाथमधील शिवाजीनगर आज हादरले. अंबरनाथमध्ये (Ambarnath) दिवसढवळ्या गोळीबार (Firing) केला गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्लात दोघां भावांवर हल्ला करण्यात आला  असून गोळी लागताच एका भावाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर धारदार शस्राने वार (stab with a sharp weapon) करण्यात आल्याने गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर पोलिसांनी तात्काळ आळा घालावा अशा मागणी करण्यात आली आहे.

तिघांजणांकडून हा हल्ला करण्यात आला असून तुषार गुंजाळ यांचा यामध्ये मृत्यू झाला असून गणेश गुंजाळ हे  जखमी झाले आहेत. या दोघांचे गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर परिसरातील काही जणांबरोबर व्यावसायिक पातळीवर वाद होते.

गुंजाळ बंधूंबरोबर याआधीही वाद

त्यावरुन मागील काही दिवसांपासून गुंजाळ बंधू आणि त्यांच्या विरोधकांमध्ये नेहमीच वाद होत होते. त्यांचे हे वाद अगदी पोलीस स्टेशनपर्यंतही गेले होते, ज्यावेळी शिवाजीनगर पोलिसात गुंजाळ बंधू आणि त्यांच्या विरोधकांना ज्यावेळी बोलवून घेण्यात आले होते, त्यावेळी पोलिसांसमोरच मारामारीही झाली होती. त्यामुळे हा वाद गेल्या काही दिवसांपासून धुमसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ कॉलवरुन धमकी

अंबरनाथमधील शिवाजीनगरमधील तुषार आणि गणेश गुंजाळ यांना कालही व्हिडीओ कॉल करुन धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आज थेट शिवाजीनगर येथे येऊन गोळीबार आणि एकावर हत्याराने वार करण्यात आल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत असून हे वाद नेमके कशामुळे झाले आणि गोळीबार का करण्यात आला त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.