VIDEO: नालेसफाईसाठी 10 वर्षात 964 कोटी खर्च, तरीही अर्धा तासात मुंबईची तुंबई कशी?; भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल

| Updated on: Sep 28, 2021 | 6:11 PM

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतही सकाळापासूनच पावसाने जोर धरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहेत. (amit satam slams shiv sena over nullah cleaning)

VIDEO: नालेसफाईसाठी 10 वर्षात 964 कोटी खर्च, तरीही अर्धा तासात मुंबईची तुंबई कशी?; भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल
amit satam
Follow us on

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतही सकाळापासूनच पावसाने जोर धरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहेत. मुंबईत अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने पाणी भरल्याने भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. पालिकेने गेल्या दहा वर्षात 964 कोटी रुपये खर्च केले आहेत. मग मुंबईत का पाणी भरत आहे, असा सवाल अमित साटम यांनी केला आहे. (amit satam slams shiv sena over nullah cleaning)

अमित साटम यांनी एक व्हिडीओ शेअर करून मुंबईत पाणी तुंबल्याचं दाखवलं आहे. तसेच महापालिके दहा वर्षात खर्च केलेल्या रकमेचा तपशीलांची कागदपत्रेही सार्वजनिक केली आहे. गुलाब वादळाच्या परिणामामुळे मुंबईत काही भागांत तुरळक तर काही भागांत मुसळधार पाऊस पडला. पण एवढ्याशा पावसात सुध्दा मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. भाजपचे आमदार अमित साटम यांनी याबाबत जोरदार आरोप करत शिवसेनेला धारेवर धरले आहे. त्यांनी महापालिकेने गेल्या दहा वर्षात नालेसफाईवर किती पैसे खर्च केले याचा हिशोबच मांडला आहे.

साटम यांनी मांडला हिशोब

महापालिकेने गेल्या दहा वर्षात छोटा नाल्यांचा गाळ स्वच्छ करण्यासाठी 338 कोटी, मोठ्या नाल्यांचा गाळ काढण्यासाठी 460 कोटी, मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी 140 कोटी रुपये तर रेल्वेच्या नाल्याचा गाळ स्वच्छ करण्यासाठी 26 कोटी रूपये खर्च केले आहेत. म्हणजे महापालिकेने या सर्व नाल्यांवर गेल्या दहा वर्षात 964 कोटी रुपये खर्च केले आहेत. तरी मुंबईत दर वर्षी पावसाळ्यात मुंबई तुबंतेच. तसेच महापालिका 100 टक्क्याहून अधिक नालेसफाई झाल्याचा दावा करतेच, असं साटम यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझे कोण?

अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने मुंबईत पाणी भरले. महापालिका कधी 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करते तर कधी 114 टक्केचाही दावा केला होता. महापालिका आयुक्तांनीही 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. 100 टक्के नालेसफाई केल्याचा दावा समजू शकतो, पण 104 टक्के? हे अतिच झालं, असं ते म्हणाले. पालिकेने दर वर्षाला 100 कोटीपेक्षा जास्त पैसे नालेसफाईसाठी खर्च केले आहेत.
गेल्या 20 वर्षात सुमारे दोन हजार तर वर्षाला सरासरी सुमारे एक हजार कोटी रुपये नालेसफाईवर खर्च केले आहेत. या दहा वर्षात चितळे समितीच्या अहवालानंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणला. नालेरुंदीकरण आणि इतर कामांसाठी 6 हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र तरीही रस्ते खड्ड्यात आहेत. मुंबईत पाणी भरतेच आहे. त्यामुळे मुंबई पालिकेत बसणारे सचिन वाझे कोण? हा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत, असं साटम म्हणाले. (amit satam slams shiv sena over nullah cleaning)

संबंधित बातम्या:

अनिल परब तो झांकी है, उद्धव ठाकरे अभी बाकी है; नितेश राणेंच्या सूचक विधानाने खळबळ

Maharashtra Rain and Weather Live update : पावसाचा हाहा:कार, 48 तासांत तब्बल 10 जणांचा मृृत्यू

मुंबईतील खड्ड्यांवरुन किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं, निलेश राणे म्हणतात, महापौरांना 2021 चा बेस्ट ड्रामा अवॉर्ड द्यायला हवा!

(amit satam slams shiv sena over nullah cleaning)