AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी विसरायला लागलो…; LIVE भाषणात अमित ठाकरे देशाच्या परिेस्थितीवर बोलता बोलता अचानक ब्लँक, स्टेजवरून निघून गेले, VIDEO

अमित ठाकरे मनसे विद्यार्थी मेळाव्यात भाषण देताना भावूक झाल्याने काही क्षण ब्लँक झाले आणि भाषण विसरले. ‘मी परत येतो’ असे सांगून ते स्टेजवरून निघून गेले. मात्र, अवघ्या दहा मिनिटांत परत येऊन त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

मी विसरायला लागलो...; LIVE भाषणात अमित ठाकरे देशाच्या परिेस्थितीवर बोलता बोलता अचानक ब्लँक, स्टेजवरून निघून गेले, VIDEO
amit thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 12:03 PM
Share

मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला अमित ठाकरे मार्गदर्शन करत होते. पण मार्गदर्शन करता करता अमित ठाकरे भाषणच विसरले. अमित ठाकरे देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवर बोलत होते. बोलता बोलता त्यांना भरून आलं. भावूक झाले. त्यामुळे थोडावेळ काय बोलायचं हेच सूचेना. ते ब्लँक झाले आणि मी भाषण विसरलो. परत येतो, असं सांगून अमित ठाकरे चक्क निघून गेले. त्यामुळे मनसे सैनिकही आवाक् झाले. पण एक 10 मिनिटानंतर अमित ठाकरे परत स्टेजवर आले आणि तडाखेबंद भाषण करत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा मुंबईत सुरू आहे. या मेळाव्याला प्रचंड गर्दी जपली आहे. या मेळाव्याला अमित ठाकरे संबोधित करण्यासाठी उभे राहिले. अमित ठाकरे स्टेजवर येताच जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यांनी अंगातलं जॅकेट काढलं. लव यू टू म्हणाले. हसले. नमस्कार केला. थोड्या घोषणा द्या म्हणजे माझं भाषण अटपेल, असं अमित ठाकरे मिश्किलपणे म्हणाले. त्यांनी हे आवाहन करताच मनसे सैनिकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर अरे मी मजाक केली, असं अमित ठाकरे म्हणाले आणि त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

राज साहेबांचा मुलगा नसतो तर…

आपला कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ज्या ज्या तरुणांनी तरुणींनी आंदोलन करून केंद्रातला राजीनामा घेतला. त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी जेन्यूअनली सांगतो, मी राज साहेबांचा मुलगा आहे म्हणून मी राजकारणात आहे. राज साहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात नसतो. मी जाणूनबुजून सांगतो. राज साहेब माझे वडील आहे म्हणून नाही. राजकारणात आहेत म्हणून नाही. माणूस प्रामाणिक आहे. तुमच्यासारखे सहकारी मिळाले नसते तर राजकारणात टिकलो नसतो हे छाती ठोकपणे सांगतो, असं अमित ठाकरे म्हणाले.

तुमच्यामुळेच…

जेन्यूअनली सांगतो. आपली जी काही आंदोलने झाली, मला पक्षात पद मिळालं. त्यानंतर आपण महाराष्ट्राचा दौरा केला. अनेक तरुण तरुणींना भेटलो. तुम्ही आपल्या युनिट स्थापनेचा कार्यक्रम चांगला राबवला. त्यामुळे आपण इथपर्यंत आलो. मला माहीत नाही मी तुमच्याशिवाय काय केलं असतं, असं नम्रपणे त्यांनी सांगितलं.

अन् ब्लँक झाले

जेन्युअनली सांगतो. आपण आजवरची आंदोलने विसरले पाहिजे. तुम्हाला आठवतं पण मला वाटतं विसरलो पाहिजे. आपण यश मिळेपर्यंत आंदोलन केलं. थांबलो नाही. आपण ही आंदोलने विसरलं पाहिजे. पुढे गेलं पाहिजे. देशाची, राज्याची परिस्थिती काय झाली हे पाहिलं पाहिजे. आता विसरलं पाहिजे. मी जेन्यूअनली सांगतो… आता.. अं… मी विसरायला लागलो… जेन्यूअनली… मी विसरायला लागलो. मला सूचत नाहीये. मी येतो परत थांबा, असं म्हणत अमित ठाकरे यांनी स्टेज सोडला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा