AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2029 आधीच पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा बाजार उठेल; संजय राऊत यांचा घणाघात

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र हल्ला चढवला आहे. "२०२९ पूर्वीच मोदी-शाह यांचा बाजार उठेल," असा घणाघात त्यांनी केला. भाजपने हिंसेच्या धमक्या दिल्या तर जशास तसे उत्तर मिळेल, असा इशाराही राऊतांनी दिला. त्यांनी टिळक कुटुंबावरही टीका केली आणि भाजप नेत्यांना 'गुंड' संबोधले.

2029 आधीच पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा बाजार उठेल; संजय राऊत यांचा घणाघात
PM Narendra ModiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 11:07 AM
Share

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात गोंधळ घातला तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपने दिला आहे. भाजपच्या या इशाऱ्याच्या राऊत यांनी चिंधड्याच उडवल्या. तुम्हा काय हिंसेच्या गप्पा करता? तुमच्या लाठ्याकाठ्या खाऊन मुलं क्रांती करायला तयार झाली आहेत. तुम्ही आड येऊ नका. 2029च्या आधीच तुमचा बाजार उठलेला असेल. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा बाजार उठलेला असेल. यांच्या गृहखात्याचा लिलाव झालेला असेल, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. काँग्रेस आणि इतरांनी आंदोलन करायचे ठरवलं हा त्यांचा अधिकार आहे. भाजपमध्ये हिंसा करण्याचा दम आहे का? रात्री 12 वाजता तुमचे पंतप्रधान व्हिडिओ टाकतात. दिवसा व्हिडिओ टाकायला घाबरतात. तुम्ही आम्हाला हिंसेच्या गप्पा मारता. त्या मुलांनी तुम्हाला नमवलं. तुम्हाला गुडघ्यावर आणलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

लाज वाटली पाहिजे

यावेळी राऊत यांनी टिळक कुटुंबावरही टीका केली. लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. काय झालं काय टिळकांच्या कुटुंबाला? शिंदेंच्या गटात टिळकांचं कुटुंब गेलं. लाज वाटली पाहिजे. स्वाभिमानाचा लढा ज्यांच्या पूर्वजांनी लढला. मंडालेच्या तुरुंगात गेले. डोंगरीच्या तुरुंगात गेले. जालियनवाला बाग हत्याकांडाचा कडक शब्दात धिक्कार केला त्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना दिला जातो, ज्यांच्या हस्ते दिला जातो. त्यांनी जंतरमंतर कांड केलं. जालियनवालानंतरचं हे कांड आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

तुम्ही तर गुंड

गृहमंत्री येणार म्हणून पुण्यात आर्मी आणल्याचं कळलंय. महाराष्ट्राचा पोलीस फोर्स आणला. तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही मूळचे गुंड आहात. तुम्ही एक तर गुंडासारखे वागा किंवा गृहमंत्र्यासारखे वागा. आम्हाला लोक गुंड म्हणतात. आम्ही गुंडासारखे वागतो, असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओवरूनही त्यांच्यावर टीका केली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा