अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य तर शर्मिला ठाकरेंचं टेनिसचं कसब

राजकारणाच्या कोर्टवर फटकेबाजी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या टेनिस कोर्टवर पाहायला मिळत आहेत (Amit Thackeray playing football at Shivaji Park).

अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य तर शर्मिला ठाकरेंचं टेनिसचं कसब


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आज (13 नोव्हेंबर) संध्याकाळी मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर आले. तिथे गरीब मुलांना फुटबॉलचे मोफत प्रशिक्षण देणाऱ्या ‘फुटबॉल फुटी’ या क्रीडासंस्थेने अमित यांना फुटबॉल खेळण्याचे आमंत्रण दिले. तेव्हा काही काळ ते इथल्या फुटबॉलपटुंमध्ये रमले. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या टेनिस कोर्टवर टेनिस खेळण्याचा आनंद लुटताना दिसल्या (Amit Thackeray playing football at Shivaji Park).

राजकारणाच्या कोर्टवर फटकेबाजी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या टेनिस कोर्टवर पाहायला मिळत आहेत. राज यांचा टेनिस कोर्टमधील एक फोटो गुरुवारी (12 नोव्हेंबर) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे टेनिस कोर्टवर खेळाचा आनंद घेताना दिसल्या. यावेळी राज ठाकरे शेजारी बसून निरीक्षण करत होते.

मनसेकडून शिवाजी पार्क येथे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर ठाकरे कुटुंबीयांनी शिवाजी पार्क येथील टेनिस कोर्टवर टेनिस खेळण्याचा आनंद लुटला (Amit Thackeray playing football at Shivaji Park).

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचे टेनिस कोर्टमधील फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये राज ठाकरे आणि अमित ठाकरे टेनिस खेळण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळाले होते. त्यानंतर काल राज ठाकरे यांचा एक फोटो शेअर झाला. त्या फोटोत राज यांच्या डोळ्यावर गॉगल आणि हातात चहाचा कप होता. तो रुबाबदार फोटो पाहून अनेकांनी राज यांच्या फिटनेसचं कौतुक केलं होतं.

कोरोना संकटात अनेकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांचं निवासस्थान असेलेल्या ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन अनेक संस्था, संघटनांनी आपल्या समस्या मांडल्या. राज यांनी अनेकांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्नदेखील केला. लॉकडाऊनदरम्यान राज ठाकरेंकडे समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने ‘कृष्णकुंज’ला ‘प्रतिमातोश्री’देखील म्हटलं जाऊ लागलं होतं. त्यानंतर राज ठाकरे टेनिस कोर्टवर पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या : Dashing Raj Thackeray | हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल, स्पोर्ट्समन राज ठाकरेंचा टेनिस कोर्टातील रुबाबदार फोटो व्हायरल

VIDEO : ड्रिबलिंग, पासिंग, हेडर, अमित ठाकरेंचं जबरदस्त फुटबॉल ‘स्किल’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI