AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा लटकेंवर शिंदे-भाजपकडून दबाव- ठाकरे गट, राजीनाम्याच्या ‘त्या’ 2 पत्रांमुळे सारा घोळ झाला?

शिंदे-भाजप गटाला अजून उमेदवारच न भेटल्यामुळे ऋतुजा लटकेंची अडवणूक सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे.

ऋतुजा लटकेंवर शिंदे-भाजपकडून दबाव- ठाकरे गट, राजीनाम्याच्या 'त्या' 2 पत्रांमुळे सारा घोळ झाला?
| Updated on: Oct 12, 2022 | 10:10 PM
Share

अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई : आधी शिवसेना (Shivsena) कोण यावरुन झालेला वाद कोर्टात केला.नंतर कुणाकडे किती प्रतिज्ञापज्ञ आहेत, याचा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला.कुणाला कुठलं चिन्ह हवंय., तो वादही गाजला.आणि आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा (Rutuja Latke) वादही कोर्टाच्या दारात गेलाय. ठाकरे गटाच्या आरोपांनुसार त्यांच्या उमेदवार ऋतुजा लटकेंवर शिंदे आणि भाजपकडून दबाव टाकला जातोय.आमच्या पक्षाकडून लढण्यासाठी लटकेंना शिंदे गटानं ऑफर दिल्याचे आरोप होतायत. मात्र त्याला ऋतुजा लटकेंनी नकार दिल्यामुळेच आता महापालिकेनं त्यांचा राजीनामा रोखून धरल्याचा दावा केला जातोय.

ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी आणि होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. त्या मुंबई महापालिकेत लिपीक म्हणून काम करतात.

मात्र नियमाप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्याला निवडणुकीत उतरण्यासाठी राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार ऋतुजा लटकेंनी 2 सप्टेंबरला आपल्या राजीनाम्याचा अर्ज केला.

मात्र तो अर्ज चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा दावा जवळपास महिन्याभरानंतर मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतोय.

ऋतुजा लटकेंनी महापालिकेला राजीनाम्यासाठी दिलेले 2 पत्र टीव्ही 9 मराठीला मिळाली आहेत. त्यापैकी 2 सप्टेंबरच्या पत्रात निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत माझ्या पदाचा राजीनामा देण्याची अट शिथील करावी, असं लिहिलं गेलंय.

तर 3 ऑक्टोबरच्या पत्रात माझ्या लिपीकपदाचा राजीनामा लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती करण्यात आलीय.

नियमांनुसार, ऋतुजा लटके या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असून त्यांचा राजीनामा आयुक्तांपर्यंत न जाता विभागीय पातळीवर मंजूर होणे आवश्यक होते.

नियमाने राजीनामा दिल्यानंतर सेवा समाप्तीस एक महिना पूर्ण होत नसल्यास एक महिन्याचा पगार कोषागरात जमा करावा लागतो .ऋतुजा लटके यांनी सर्व कागदपत्रे सादर केले असून त्यांची फाइल तयार आहे.

मात्र, त्यांना राजीनामा चुकीच्या पद्धतीने देण्यात आला असल्याचे एक महिन्याने सांगण्यात आले.राजीनामा चुकीच्या पद्धतीने असता तर त्याच वेळेस त्यांना कल्पना का दिली गेली नाही .

आता या साऱ्यात पेच असा फसलाय की, अंधेरी पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी 2 दिवस बाकी आहेत. एकीकडे महापालिकेनं अजूनही ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारलेला नाही.दुसरीकडे शिंदे गटानं अद्याप त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही.आणि भाजपकडून मुरजी पटेलांनी जरी प्रचार सुरु केला असला तरी भाजपनं त्यांना अद्याप अधिकृत तिकीट दिलेलं नाही.

शिंदे-भाजप गटाला अजून उमेदवारच न भेटल्यामुळे ऋतुजा लटकेंची अडवणूक सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे.मात्र सरकार हे आरोप फेटाळून लावतंय.

आता अंधेरी पोटनिवडणूक नेमकी का महत्वाची आहे., तिथली समीकरणं काय आहेत…

2019 मध्ये अंधेरी पूर्व विधानसभेतून शिवसेनेचे रमेश लटके जिंकले, मात्र दरम्यानच्या काळात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्याच जागी आता पोटनिवडणूक होत असून शिवसेनेनं रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिलीय

ही निवडणूक का महत्वाची आहे ते पाहूयात…

पहिला मुद्दा म्हणजे शिवसेना फुटीनंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. दुसरा मुद्दा याच निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण तात्पुरता गोठवलंय तिसरा मुद्दा याच निवडणुकीसाठी ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळालंय. आणि चौथा मुद्दा ही निवडणूक फक्त एका आमदारकीची असली, तर शिवसेना फुटीनंतर मुंबईकर कुणाच्या पाठिशी उभे आहेत, हे या निवडणुकीत समजणार आहे

2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढवली. तेव्हा शिवसेनेचे उमेदवार रमेश लटकेंना ५२ हजार ८१७. तर भाजपचे उमेदवार सुनील यादवांना ४७ हजार ३३८ मिळाली. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून सुरेश शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीतून इथं एकत्र लढली. सेनेकडून पुन्हा रमेश लटकेंना तिकीट मिळालं. तर काँग्रेसमधून भाजपत आलेल्या मुरजी पटेलांना युतीमुळे तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मुरजी पटेलांनी अपक्ष निवडणूक लढवलेली असली तरी त्यांच्या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. निकालावेळी शिवसेनेचे रमेश लटके 62 हजारांहून जास्त मतं घेऊन जिंकले. तर अपक्ष उमेदवार मुरजी पटेलांना 45 हजार मतांवर समाधान मानावं लागलं. आता त्याच 2019 मध्ये शिवसेनेविरोधात अपक्ष राहिलेल्या मुरजी पटेलांनी स्वतःला भाजपचा उमेदवार म्हणून प्रचार सुरु केलाय. मात्र भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार अजून त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेत 2 लाख 73 हजार 509 मतदार आहेत., त्यापैकी एक दाव्यानुसार या मतदारसंघात मराठी आणि उत्तर भारतीयांची संख्या समसमान आहे त्यानंतर मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारही इथं आहेत साकीनाका, महाकाली गुंफा, पवईचा काही भाग, अंधेरी-कुर्ला रोड, पश्चिम द्रुतगती महामार्गालगतचा भाग, गुंदवली, भवानी नगर, विजय नगर असे काही

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...