AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING : अनिल देशमुख यांची जेलमधून सुटका होणार? वकिलांनी सीबीआयचे सर्व दावे फेटाळत केले गंभीर आरोप, प्रचंड युक्तीवाद, कोर्टात काय-काय घडलं?

सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयतर्फे विरोध करण्यात आलाय. मात्र देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी युक्तिवादादरम्यान सीबीआयवर गंभीर आरोप केले आहेत.

BREAKING : अनिल देशमुख यांची जेलमधून सुटका होणार? वकिलांनी सीबीआयचे सर्व दावे फेटाळत केले गंभीर आरोप, प्रचंड युक्तीवाद, कोर्टात काय-काय घडलं?
अनिल देशमुख
| Edited By: Chetan Patil | Updated on: Dec 08, 2022 | 8:59 PM
Share

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं निकाल राखून ठेवलाय. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीनासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. देशमुखांतर्फे ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी तर सीबीआय तर्फे वकील एएसजी अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या कोर्टासमोर देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून निर्णय राखून ठेवण्यात आलाय. मात्र देशमुख यांना दिलासा मिळणार की नाही? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न असून याकडे देशमुख कुटुंबियांसह सर्वांचं लक्ष राहणार आहे.

सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयतर्फे विरोध करण्यात आलाय. मात्र देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी युक्तिवादादरम्यान असा आरोप केलाय की, तपास यंत्रणेकडे कुठलेही पुरावे नसून या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेने दिलेल्या जाबाबाच्या आधारे अनिल देशमुख यांना दोषी ठरविलं जातंय.

अनिल देशमुख यांचं वाढतं वय लक्षात घेता त्यांना अनेक आजार आहेत. अनेकवेळा ते चक्कर येवून पडलेदेखील आहेत. हे सर्व लक्षात घेता त्यांना जामीन देण्यात यावा, अशी विनंती वकिलांकडून करण्यात आली. एवढंच नव्हे तर देशमुख यांना वैद्यकीय उपचार पाहिजे, तसे मिळत नाहीत, असाही आरोप वकील विक्रम चौधरी यांनी सुनावणी दरम्यान केला.

एकीकडे वकील विक्रम चौधरी यांनी आपल्या युक्तिवादामध्ये असा दावा केलाय की, सचिन वाझे हा अनिल देशमुख नव्हे तर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निर्देशावर वसुली करत होता. वाझेला यापूर्वी देखील पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. दहशतवाद पसरविणे, हत्या, वसुली सारखे अनेक गंभीर आरोप वाझेवर असून वाझेने दिलेल्या जबाब विश्वशहार्य नाही, असा दावा विक्रम चौधरी यांनी केला .

मात्र सीबीआय तर्फे अनिल देशमुख यांना जामीन देण्याचा विरोध करण्यात आला. देशमुख हे प्रभावशाली व्यक्ती असून जामीन दिला तर ते तपासावर प्रभाव आणू शकतात. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. देशमुख यांच्या निर्देशावर सचिन वाझे बार मालकाकडून वसुली करत असल्याचा गंभीर आरोप वकील अनिल सिंह यांनी केला. म्हणून अनिल देशमुख यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी सीबीआयतर्फे कोर्टात करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी