इकबाल मिर्ची संबंधित वाधवानकडून दोन वेळा 10 कोटी स्वीकारले, अनिल गोटेंचे देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर खळबळजनक आरोप

ईडीनं आता यावरही कारवाई करावी. दर मंगळवारी फडणवीसांच्या काळात असलेल्या मंत्र्याची इथं येऊन तक्रार करणार आहे. पुराव्यानिशी तक्रार करणार आहे, असं अनिल गोटे म्हणाले.

इकबाल मिर्ची संबंधित वाधवानकडून दोन वेळा 10 कोटी स्वीकारले, अनिल गोटेंचे देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर खळबळजनक आरोप
अनिल गोटेImage Credit source: Tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 11:17 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे आज ईडी कार्यालयात तक्रार करण्यासाठी आले होते. आर. के डब्ल्यू.. म्हणजे राजेश कुमार वाधवान ज्यांनं पीएमसी बँक (PMC Bank) बुडवली, जो स्वतः आता तुरुंगात आहेत, त्याच्या कंपनीचा इक्बाल मिर्ची हा भागीदार आहे. ज्यावेळेला 2014-15 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आलं. त्या नंतर त्यांनी सरकारला दत्तक दिलेली ही देणगी आहे. जसं नवाब मलिकांना त्यांनी अतिरेक्यांशी संबंध असलेल्या माणसाकडनं जमीन घेतली म्हणून अटक केली. आता हा तर डायरेक्ट अतिरेक्याशीच संबंध असल्याच मी पुरावा तुम्हाला दाखवोय. हा पुरावा.. हा इलेक्शन कमिशनचा कागद त्याचा पुरावा आहे. 46 नंबरवर त्याचं नाव आहे. याचे डिटेल्स आता मी त्यांना दाखवणार आहे, असं अनिल गोटे म्हणाले.

दोनदा 10 कोटी मिळाले

माझी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार आहे. राकेश कुमार वाधवानकडून त्यांना 10 कोटी रुपये मिळाले आहेत. आरके डब्ल्यू कंपनीनं एकदा नाही दोनदा त्यांना पैसे दिलेत. आर के डब्लू चा पैसा आहे. इकबाल मिर्ची 93 ब्लास्टमध्ये ज्याचा सहभाग होता, त्या ही देणगी देण्यात आली होती. 2014 आधी त्यांना असं डोनेशन कधीच मिळालं नव्हतं. सरकार आल्यानंतर देणगी मिळाली. 20 कोटी रुपये देण्यात आलेत. सरकार आल्यानंतर हे पैसे देण्यात आलेत, असं अनिल गोटे म्हणाले.

इकबाल मिर्ची दाऊदचा राईट हॅन्ड असलेल्याकडून पैसे घेतलेत. नवाब मलिकांना तुम्ही तिसऱ्या माणसाकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक करत असाल तर तुम्ही तर त्याच्याहीपेक्षा मोठे आरोपी आहात.  हे तर डायरेक्टच आहेत, असंही  अनिल गोटे यांनी स्पष्ट केलं.

मी भाजपमध्ये असताना मला माहित नव्हतं. मलिकांना अटक केल्यानंतर मी संशोधन केलं, त्यात मला ही सनसनाटी माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर जबाबदार नागरिक म्हणून मी इथं आलो. ईडीनं आता यावरही कारवाई करावी. दर मंगळवारी फडणवीसांच्या काळात असलेल्या मंत्र्याची इथं येऊन तक्रार करणार आहे. पुराव्यानिशी तक्रार करणार आहे, असं अनिल गोटे म्हणाले.

इतर बातम्या:

Video: पहिल्यांदाच यूक्रेन-रशियातली चर्चा हस्तांदलोनाने झाली, खुद्द रशियन सरकारी चॅनलचं ट्विट

नारायण राणे, नितेश राणे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार, दिशा सॅलियनच्या पालकांची तक्रार

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.