‘खडसेंच्या विधानाने तळपायाची आग मस्तकात’, अंजली दमानिया संतापल्या, खडसेंना उत्तर देणार

| Updated on: Oct 22, 2020 | 12:43 PM

एकनाथ खडसे यांनी भाजपला राम-राम ठोकताना फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यात अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचाही उल्लेख खडसेंनी केला. त्यावर अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत.

खडसेंच्या विधानाने तळपायाची आग मस्तकात, अंजली दमानिया संतापल्या, खडसेंना उत्तर देणार
Follow us on

मुंबई: राज्याच्या राजकारणातील मोठं नाव असलेले एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरत बुधवारी भाजपला राम-राम ठोकला. त्यावेळी त्यांनी एका विनयभंगाच्या प्रकरणाचा उल्लेख करत फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंवर विनयभंगाचा आरोप केला होता आणि फडणवीसांच्या सांगण्यावरुनच आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. खडसेंच्या या आरोपांवर आता अंजली दमानिया चांगल्याच संतापल्या आहेत. (Anjali Damania will answers khadse’s alligation)

‘एकनाथ खडसे यांनी काल पत्रकार परिषदेत माझ्याबद्दल काही वक्तव्य केलं. यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला. कारण तेव्हा मी घरी नव्हते आणि खडसे नेमकं काय म्हणाले हे मी प्रत्यक्षात ऐकले नव्हते. पण रात्री जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. आज पुन्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना माझ्याबद्दल अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं आहे. आज दुपारी 4.30 वाजता या विषयावर मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रिकार परिषद घेणार आहे’, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

‘अंजली दमानिया यांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यावेळी पोलिस गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. पण फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला’, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खोटे आरोप करण्यात आले. पण कोणत्याही राजकीय पक्षानं माझ्या राजीनाम्याची किंवा चौकशीची मागणी केली नव्हती. पण एकट्या फडणवीसांमुळे मला मनस्ताप सहन करावा लागला. फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडतो आहोत’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

खडसेंच्या आरोपांना फडणवीस योग्य वेळी उत्तर देणार

अंजली दमानिया यांनी आपल्यावर खोटा आरोप केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, अशा वेळी कुणाला तरी विलन करावं लागतं आणि खडसेंनी मला विलन केलं आहे. खडसेंच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यावं लागलं : एकनाथ खडसे

विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने मला एबी फॉर्म दिला होता; एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

Raksha Khadse | एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

Anjali Damania will answers khadse’s alligation