...म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यावं लागलं : एकनाथ खडसे

"फडणवीसांना विलन ठरवलं नाही. कोणत्याही निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम होतात. चांगले परिणाम झाले तर गुणगाण होतं. जे वाईट झालं ते नेतृत्वाने का स्वीकारु नये?", असा सवाल खडसेंनी केला (Eknath Khadse on Devendra Fadnavis).

...म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यावं लागलं : एकनाथ खडसे

मुंबई : “माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. भ्रष्टाचाराचे आरोप झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यावेळी माझं नेतृत्व करत होते. त्यामुळे त्यांनी माझा दोषही स्वीकारला पाहिजे होता. सभाग्रृहात त्यांना बोलता आलं नाही. सभाग्रृहाच्या बाहेरही ते काही बोलू शकले नाहीत. म्हणून मला नाईलाजाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यावं लागलं”, अशी खदखद भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली (Eknath Khadse on Devendra Fadnavis).

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत प्रश्व विचारण्यात आला. ‘एकनाथ खडसे यांनी मला विलन ठरवलं’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर ‘फडणवीसांमुळेच पक्ष सोडावा लागला’, अशी भूमिका खडसेंनी मांडली.

“फडणवीसांना विलन ठरवलं नाही. कोणत्याही निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम होतात. चांगले परिणाम झाले तर गुणगाण होतं. जे वाईट झालं ते नेतृत्वाने का स्वीकारु नये?”, असा सवाल खडसेंनी केला (Eknath Khadse on Devendra Fadnavis).

“माझं भाषण मुक्ताईनगरला सुरु होतं. भाषणात मी काहीच अश्लील बोललो नाही. माझ्या शेतातील आंब्याचा विषय होता. यावरुन अंजली दमानिया यांनी गुन्हा दाखल करायला भाग पाडलं. वास्तविक विनयभंगाचा गुन्हा करायचा असेल तर समोर व्यक्ती लागते. कुणी अमेरिकेत राहिलं आणि मी मुक्ताईनगरला राहिलो तर तसे गुन्हे दाखल होत नाहीत. त्यांनी गोंधळ केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनला फोन करुन गुन्हा नोंद करा, असे आदेश दिले”, असं खडसेंनी सांगितलं.

“मला ज्यावेळेला समजलं तेव्हा मी देवेंद्र यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनी बाई गोंधळ घालत होती, अशी कारणं दिली. आयुष्यभर ज्यांनी चारित्र्य जपलं अशा व्यक्तीवर अशाप्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणं, अप्रत्यक्ष त्याला मदत करणं चुकीचं आहे. या गोष्टी मी सहज बोलत नाही तर पुराव्यानिशी बोलतो. मला फार मानसिक यातना झाल्या”, असं खडसे म्हणाले.

“विनयभंगाचा खटला खारीज झाला. मी एकटा गुन्हेगार आहे, असं समजून मला राजीनामा द्यायला सांगितला. मंत्रिमंडळात दहा-बारा लोकांवर आक्षेप आले. त्यांच्या चौकश्या झाल्या. एका मंत्र्यावर तर सीबीआयची तक्रार होती. त्यांना मात्र क्लीन चीट, पण एकनाथ खडसेंना क्लीन चीट नाही. त्याला कारण काय?”, असा सवाल खडसेंनी केला.

“पक्षाच्या वरिष्ठांकडे मी वारंवार याबाबत तक्रारी केल्या. हे फडणीसांनाही माहिती आहे. संघटन मंत्र्यांशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनादेखील या गोष्टी सांगितल्या”, असं खडसे म्हणाले.

“चार वर्षांमध्ये सर्वांकडे तक्रार केली. सर्वांना माझा दोष सांगा हे विचारला. पण देवेंद्र फडणवीस हेच पक्षातील अंतिम निर्णय होते. देवेंद्र सांगितील तेच होत गेलं. ते पक्षात आहेत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, ही माझी भावना झाली. या व्यक्तीगत कारणामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला”, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, मी राष्ट्रवादीत गेलो तर अनैतिकता का? खडसेंचा फडणवीसांना सवाल

‘विधानसभेतच राष्ट्रवादीचा एबी फॉर्म रेडी होता’, एकनाथ खडसेंकडून मोठा खुलासा

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- खडसे

10 आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *