Eknath Khadse Exclusive | अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, मी राष्ट्रवादीत गेलो तर अनैतिकता का? खडसेंचा फडणवीसांना सवाल

विधानसभेनंतरही शिवसेनेसोबत युती असती तर दोन-तीन वर्ष आम्ही (भाजप) सरकारमध्ये असतो, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

Eknath Khadse Exclusive | अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, मी राष्ट्रवादीत गेलो तर अनैतिकता का? खडसेंचा फडणवीसांना सवाल

मुक्ताईनगर (जळगाव) : अजित पवार यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेता, ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का? असा रोखठोक सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेशापूर्वी एकनाथ खडसे मुक्ताईनगरमधून ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधत होते. (Eknath Khadse asks Devendra Fadnavis whether early morning oath ceremony was moral)

“पक्षाचा निर्णय सामूहिक आहे, असं समजून मी 40 वर्ष पक्षाच्या आदेशाचं पालन करत आलो. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे ते नेते होते, मुख्यमंत्री होते, दुसऱ्यांना क्लीन चिट दिली, तशी मलाही देता आली असती. विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना ते सांगू शकले असते की चुकीचं काम करु नका, पण त्यांनी परवानगी दिली. मला सांगितलं काळजी करु नका, तीन महिन्यात मंत्रिमंडळात परत घेऊ. आपण विश्वास ठेवायचा, नि विश्वासघात करायचा असं अनेकदा व्हायचं” अशी खदखद एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

“निर्णय घेणारा दुसरा माणूस नव्हता. विधानसभेला युती केली असती तर चित्र वेगळं असतं. विधानसभेनंतरही शिवसेनेसोबत युती असती तर दोन-तीन वर्ष आम्ही (भाजप) सरकारमध्ये असतो. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला हवं होतं. अजित पवार यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेता, ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का?” असा सवाल खडसेंनी विचारला.

“फडणवीस असेपर्यंत न्याय न मिळण्याची भावना”

देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला, अशा भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्या. मी फडणवीसांना विलन ठरवले नाही, फडणवीसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मी तिथे गेलो, त्यांना सांगितलं. आधी सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचे, पण आता भाजप ही व्यक्तिकेंद्री झाली आहे, म्हणजे एका व्यक्तीने निर्णय घ्यायचा आणि सर्वांनी मान्य करायचा, अशी खंतही खडसेंनी मांडली.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून मला ऑफर होत्या, आपण पक्षात आलात तर बरं होईल असं सांगितलं जायचं. पण संघटनात्मकदृष्ट्या विस्तारासाठी राष्ट्रवादीला इथे (मुक्ताईनगर आणि जळगाव) अधिक वाव आहे, कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे, राष्ट्रवादीकडे सक्षम आणि मोठं नेतृत्व नाही, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं खडसेंनी सांगितलं.

अनेक लोक भाजपमध्ये नाराज आहे, चंद्रकांत पाटीलही आता स्वत: निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यांनाही फडणवीसांना विचारुन निर्णय घ्यावे लागतात. एकाही नेत्याने मी भाजप सोडणार, हे कळाल्यावर फोन केला नाही, चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी फोन केला. मी अमित शाह, पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो, चार वर्षात एकही नेता नाही यांची भेट घेतली नाही, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. (Eknath Khadse asks Devendra Fadnavis whether early morning oath ceremony was moral)

संबंधित बातम्या :

‘विधानसभेतच राष्ट्रवादीचा एबी फॉर्म रेडी होता’, एकनाथ खडसेंकडून मोठा खुलासा

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- खडसे

10 आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?

(Eknath Khadse asks Devendra Fadnavis whether early morning oath ceremony was moral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI