AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रताप सरनाईकांच्या पत्राची लिंक मोदी-ठाकरेंच्या भेटीशी; अंजली दमानियांचा दावा

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या लेटरबॉम्बवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damania) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

प्रताप सरनाईकांच्या पत्राची लिंक मोदी-ठाकरेंच्या भेटीशी; अंजली दमानियांचा दावा
anjali damania
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 4:49 PM
Share

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या लेटरबॉम्बवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राची लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. (anjali damania slams shivsena over pratap sarnaik letter)

अंजली दमानिया यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना हा दावा केला आहे. डिजिटल विश्वात कोणी पत्रं लिहितं का? आपण व्हॉट्सअॅप वापरतो, फोन करतो, मेसेज करतो. मात्र, पत्रं लिहिलं जातयं आणि ते मीडियात येतंय हे हस्यास्पद आहे. या पत्रात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे शिवसेनेचा छळ केला जातोय आणि दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेना-भाजपची विचारांची जवळीक होती हा आहे. या पत्राचे तार थेट मोदी-ठाकरे भेटीशी संबंधित आहेत, असा दावा करतानाच मोदींबरोबर भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची देहबोली बदलली आहे. ते भाजपवर तीव्र शब्दात टीका करताना दिसत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेत दोन गट

शिवसेनेत दोन गट असल्याचा दावाही दमानिया यांनी केला. शिवसेनेत दोन गट आहेत. एक मिलिंद नार्वेकरांचा आणि दुसरा संजय राऊतांचा. राऊतांना शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहावसं वाटतं. तर नार्वेकरांना शिवसेनेने भाजपसोबत राहावं असं वाटतं. यांच्याकडे तत्वही नाहीत आणि विचारधाराही नाही. केवळ पैसा यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

सरनाईकांविरोधात सबळ पुरावे

प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं तरी त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यातून ते बाहेर पडू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. मात्र, आता या मुद्दयावरून भाजप राजकारण करण्याच्या तयारीत आहे. चुटकी सरशी सरकार बनवू असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. त्यामुळे सेना-भाजप पुन्हा एकत्र होईल असं दिसत आहे, असंही त्या म्हणाल्या.

खडसेंवर हल्लाबोल

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरही टीका केली. एकनाथ खडसे जे काही बोलले याची त्यांना खंत वाटायला हवी होती. पण त्यांना लाज शरम नाही. ते कधी माफी मागतील असं वाटत नाही, असंही त्या म्हणाल्या. (anjali damania slams shivsena over pratap sarnaik letter)

संबंधित बातम्या:

VIDEO: सरनाईकांचा लेटरबॉम्ब, पवारांची खलबतं, आता चंद्रकांतदादांनी घेतली फडणवीसांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

पवार-प्रशांत किशोर यांच्यात पावणे दोनतास खलबतं; विरोधकांच्या मंगळवारच्या बैठकीचा अजेंडा ठरला?

ती भेट म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय, गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

(anjali damania slams shivsena over pratap sarnaik letter)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.