AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबईत झाड कोसळून आणखी एकाचा बळी, आरे कॉलनीतील घटना

मुंबईमध्ये झाड कोसळून आता आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरे कॉलनीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. झाड कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.

मोठी बातमी! मुंबईत झाड कोसळून आणखी एकाचा बळी, आरे कॉलनीतील घटना
मुंबई अरे कॉलनी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 05, 2026 | 4:06 PM
Share

मुंबईत पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना वाढताना दिसत आहेत. मुंबईत झाड कोसळून आता आणखी एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे.  आरे कॉलनीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे.  झाड कोसळल्यामुळे झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत चेंबूर भागात स्कुल बसवर एक मोठं झाड कोसळल्याची घटना घडली होती, या अपघातामध्ये 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते, तर या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसरी घटना कुर्ला येथील नौपाडा येथे घडली, झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला. तर त्यानंतर आता आरे कॉलनीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. हसन रजा जहांगीर आलम सय्यद असं या तरुणाचं नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  शनिवारी मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. याच काळात अचानक आरे कॉलनीमधील एक झाड कोसळलं, या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही शनिवारी दुपारची घटना आहे. पावसामुळे अचानक आरे कॉलनी परिसरात एक झाड कोसळलं, या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता, त्याला रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केलं. दरम्यान या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. याचदरम्यान मुंबईतील बांद्रा, कुर्ला, अंधेरी परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गोरेगावमध्ये झाड कोसळून दोन महिला गंभीर जखमी 

गोरेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, गोरेगावच्या एम. जी. रोडवर देखील एक मोठं झडा कोसळलं आहे.  या झाडाखाली सापडून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.  स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे.   महापालिकेच्या मदतीने सुमारे १५ मिनिटांत झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आला आहे. योग्य छाटणी न झाल्याने झाड कोसळल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ