Aryan Khan Bail Granted: तीन दिवस कोर्टात युक्तिवाद, दावे आणि प्रतिदावे, कोर्टात नेमकं काय घडलं?; वाचा सविस्तर

| Updated on: Oct 28, 2021 | 6:25 PM

आर्यन खान याच्या वकिलांनी तब्बल तीन दिवस जोरदार युक्तिवाद केल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळाला आहे. (Aryan Khan, 2 Other Granted Bail, know details)

Aryan Khan Bail Granted: तीन दिवस कोर्टात युक्तिवाद, दावे आणि प्रतिदावे, कोर्टात नेमकं काय घडलं?; वाचा सविस्तर
Aryan Khan
Follow us on

मुंबई: आर्यन खान याच्या वकिलांनी तब्बल तीन दिवस जोरदार युक्तिवाद केल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे तब्बल 25 दिवसानंतर उद्या किंवा परवा शनिवारी आर्यन तुरुंगाबाहेर येईल. आज दिवसभरात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. आर्यनच्या वकिलांनी कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला? त्याला एनसीबीच्या वकिलांनी त्याला काय प्रतिवाद केला? यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

एनसीबीच्या वकिलाचा दावा काय?

एनसीबीचे वकील अनिल सिंह यांनी आर्यनच्या जामिनाला विरोध केला होता. आर्यन खान गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे. त्याचं ड्रग्ज पेडलरशी कनेक्शन होतं. त्याच्या चॅटमधून या सर्व गोष्टी बाहेर आल्या आहेत. तो ड्रग्जची विक्रीही करायचा हेही त्याच्या चॅटमधून बाहेर आल्याचं अनिल सिंह यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. आर्यनला क्रुझवरील ड्रग्ज पार्टीची माहिती होती. क्रुझवर मोठी पार्टी होणार होती. त्याने कमीत कमी गांधी जयंतीच्या दिवशी असं करायला नको होतं, असंही अनिल सिंह यांनी सांगितलं. तर, आर्यनने पार्टी केलीच नाही असं त्याच्या वकिलांचं म्हणणं असल्याचं न्यायामूर्ती सांब्रे यांनी सांगितलं. आर्यन खान पहिल्यांदा ड्रग्ज घते नाही. तर आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्ज घेत असल्याचंही सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.

रोहतगी काय म्हणाले?

यावेळी आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तीवाद केला. आर्यनची अटक संविधानाच्या अनुच्छेद 22चे उल्लंघन आहे. आर्यनला कोणत्या आधारावर अटक केली त्याची माहिती देण्यात आली नाही, असं रोहतगी म्हणाले. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कुठेही क्रुझवरील पार्टीचा उल्लेख नाही. तसेच व्हॉट्सअॅप चॅट हा काही आधार होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला शिक्षा करून त्याला त्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित केलं जाऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

एनसीबीचं हे प्रकरण एनडीपीएसच्या अधिनियमाच्या 67मध्ये दिल्या गेलेल्या स्वैच्छिक कबुलीवर अधिक निर्भर करतं. मात्र टोकन सिंह प्रकरणात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने साक्ष म्हणून अस्वीकार केलं आहे, याकडेही रोहतगी यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.

अरबाजचे वकील काय म्हणाले?

दरम्यान, अरबाज मर्चंट यांचे वकील अमित देसाई यांनीही आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. या तिघांवरही कोणताही आरोप नाहीये. त्यामुळे व्यक्तिगत द्वेषापालिकडे त्यात काही नाही. आरोपींच्या गुन्ह्याला एक वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे सीआरपीसीच्या कलम 42 अ नुसार त्यांना सादर होण्याची नोटीस द्यायला हवी होती, असं देसाई यांनी सांगितलं. अटकेवेळी या तिघांवरही कटाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अरबाज मर्चंटवर केवळ द्वेषातूनच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

किरकोळ गुन्ह्याच्या आधारावर अटक अपवाद आहे. अर्नेश कुमार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारावरूनही युक्तिवाद केला. पंजाब आणि हरयाणा कोर्टाने एनडीपीएस प्रकरणात भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम 65बीनुसार देण्यात आलेल्या प्रमाणपत्रा शिवाय सादर करण्यात आलेले व्हॉट्सअॅप चॅट पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकत नाही. डिजीटल पुरावा हा सिद्ध करता आला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

धमेचाच्या वकिलांचा युक्तिवाद

मुनमुन धमेच्या हिचे वकील अली काशिफ खान यांनीही कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. मुनमुनला क्रुझवर आमंत्रित करण्यात आलं होतं. जेव्हा एनसीबीचे अधिकारी कथित तपासणीसाठी आले होते तेव्हा सोमिया आणि बलदेवही रुममध्ये होते. व्यक्तिगत तपासणीवेळी मुनमुनकडे काहीच सापडलं नाही. रोलिंग पेपरमधून धूर निघत होता. तो पेपर सोमियाकडून जप्त करण्यात आला. मात्र, बलदेव आणि सोमियाला जाऊ दिलं गेलं, असं खान यांनी सांगितलं. मुनमुनविरोधात जाणूनबुझून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचा ड्रग्जशी काहीच संबंध नाही. एनसीबीने कायद्याचा दुरुपयोग करून हा गुन्हा दाखल केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

Maharashtra News LIVE Updates | मोठी बातमी ! आर्यन खानला अखेर जामीन

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

(Aryan Khan, 2 Other Granted Bail, know details)