Maharashtra News LIVE Updates | अंबरनाथच्या पाईपलाईन हायवेवर चार वाहनांचा विचित्र अपघात

| Updated on: Oct 28, 2021 | 10:59 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Updates | अंबरनाथच्या पाईपलाईन हायवेवर चार वाहनांचा विचित्र अपघात
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Oct 2021 10:52 PM (IST)

    अंबरनाथच्या पाईपलाईन हायवेवर चार वाहनांचा विचित्र अपघात

    अंबरनाथ :

    अंबरनाथच्या पाईपलाईन हायवेवर चार वाहनांचा विचित्र अपघात

    खड्ड्यांमधून वाट काढताना चार वाहनं एकमेकांवर आदळली

    पाले गावाजवळ घडला विचित्र अपघात

    सुदैवाने प्रवासी सुखरुप, मात्र सर्वच वाहनांचं झालं नुकसान

  • 28 Oct 2021 10:50 PM (IST)

    माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

    जळगाव :

    जळगावचे राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

    उसने घेतलेले कोट्यावधी रुपये अशोक कटारिया देण्यास टाळाटाळ करत असल्याचा ईश्‍वरलाल जैन यांनी आरोप करत केला गुन्हा दाखल

    जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल

  • 28 Oct 2021 09:21 PM (IST)

    नागपूरकरांना मोठा दिलासा, दिवसभरात एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही

    नागपूरकरांना मोठा दिलासा, दिवसभरात एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही

  • 28 Oct 2021 08:51 PM (IST)

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. देशमुखांनी ईडी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ईडीने पाठवलेले समन्स रद्द करावे, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

  • 28 Oct 2021 08:44 PM (IST)

    जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत गटबाजी मावळली

    जळगाव :

    जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत प्रसंगी गटबाजी मावळली

    पक्षातील सर्व गटातटाचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर

    जिल्ह्यात काँग्रेस बळकटीकरणासाठी पक्षश्रेष्ठींकडून गटातटाच्या पदाधिकाऱ्यांची कानउघडणी झाल्याची चर्चा

  • 28 Oct 2021 08:11 PM (IST)

    भाजप खासदार सुजय विखे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली

    संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भाजप खासदार सुजय विखे यांनी भेट घेतली संगमनेर बसस्थानकात उपोषणस्थळी भेट देत दिला आंदोलनाला पाठिंबा

    सुजय विखे यांची प्रतिक्रिया

    सर्व 22 संघटना एकत्र आल्यास मागण्या मान्य होतील सुजय विखे यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन तुम्ही सगळे एकत्र आले तर 15 दिवसात कायमस्वरूपी मार्ग निघेल आज राजकारणात अनेक पक्ष आले वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे अनेक पक्ष निर्माण झाले पक्ष वाढल्याने आणि नेते वाढल्यानं कुणाचे प्रश्न सुटले? हा माझा प्रश्न 15 वर्षांपूर्वी दोनच पक्ष होते आज त्यात वाढ झाली तरी प्रश्न सुटले का ? म्हणून काही प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचं

  • 28 Oct 2021 08:07 PM (IST)

    राज्यात कायदा आणि सुव्यस्था कुणी जुमानायला तयार नाही, आशिष शेलारांचा निशाणा

    आशिष शेलार यांची प्रतिक्रिया :

    आर्यन खान यांना जामीन मिळाला हा  कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे जास्त भाष्य करू शकत नाही.

    राज्यात कायदा आणि सुवव्यस्था कुणी जुमानायला तयार नाही अशी लोकं आज राज्यात बसली आहेत.

    आर्यनला जामीन मिळाला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी आता सुपरकोर्ट बनू नये

    नाहीतर आम्हाला त्यांची डिग्री काढावी लागेल

    क्रांती रेडकर यांच्या दुःखावर मी भाष्य करणार नाही

    त्या आमच्या बहिणीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दुःख मांडलं आहे.  राज्यातील एका मराठी मुलीने दुःख मांडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात ते पाहू

  • 28 Oct 2021 07:41 PM (IST)

    आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानने आर्यनच्या वकिलांची भेट घेतली

    आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानने आर्यनची बाजू कोर्टात मांडणाऱ्या वकिलांची भेट घेतली

  • 28 Oct 2021 07:15 PM (IST)

    सरकारकडून 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य, एसटी कामगारांचे आंदोलन मागे

    एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य

    परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबतची कामगार संघटनांची बैठक संपली

    एसटी कामगारांचे आंदोलन मागे

    28 कोटी महागाई भत्ता आणि 2 कोटी घरभाडे असा 30 कोटी रूपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार

  • 28 Oct 2021 07:13 PM (IST)

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई सत्र न्यायालयात एका गुन्ह्यातून निर्दोष बरी

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई सत्र न्यायालयाने 1983च्या एका गुन्ह्यातून निर्दोष बरी केलाय

    वर्ष 1983 मध्ये अनधिकृत दारूच्या वाहतुकी दरम्यान राजनला अटक करण्यात आली होती. मात्र त्या दरम्यान राजन आणि संबंधित पोलिसात मारामारी झाली आणि राजनने तेव्हा चाक़ूचा वापर केल्याच आरोप लावला गेला होता

    मात्र न्यायालयात हे आरोप सिद्ध न झाल्याने सत्र न्यायालयाने राजनला या गुह्यात लावलेल्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे

  • 28 Oct 2021 07:05 PM (IST)

    पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार, तीन नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    पालघर :

    पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार, बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन, वसई विरार महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीला झटका

  • 28 Oct 2021 06:51 PM (IST)

    किरीट सोमय्यांनी समीर वानखेडेंच्या परिवाराची भेट घेतली

    भाजप नेते किरीट सोमय्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

  • 28 Oct 2021 05:52 PM (IST)

    वसई विरार महापालिका क्षेत्रातील 12 जणांचा शिवसेनेत प्रवेश

    शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांची प्रतिक्रिया : - आज वसई विरार महापालिका क्षेत्रातील 12 जणांनी पक्षात प्रवेश केलाय - तलासरी तालुक्याचे तालुकाध्यक्षांचाही शिवसेनेत प्रवेश झाला आहे - शिवसेना पालघर जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष आहे, त्याला आणखी बळकटी मिळेल - मागील 30 वर्षात इथे विकासाला महत्त्व दिलं जात नाही - आजचा प्रातिनिधिक प्रवेश होता अजून प्रवेश होणार आहेत - वसई विरार महापालिका

  • 28 Oct 2021 05:48 PM (IST)

    पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात प्रसंगी काम करणाऱ्या देवदूतांचे काम बंद आंदोलन

    पुणे (मावळ) :

    -पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात प्रसंगी काम करणाऱ्या देवदूतांचे आजपासून काम बंद आंदोलन सुरू

    -या महामार्गावर अपघात प्रसंगी मोलाचे काम करणाऱ्या 67 देवदूतांचे पगारवाढी सह विविध मागण्यांसाठी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलेय

    -द्रुतगती महामार्गावर अपघात प्रसंगी तात्काळ सेवा देण्यासाठी एका खाजगी कंपनीला 2015 पासून काम करत आहे

    -मात्र मागील वर्षभरापासून देवदूतच्या कामगारांचा पगार वाढीचा प्रश्न रखडला आहे.मागील वर्षी देवदूत यंत्रणेने संपाचे हत्यार उपसल्यानंतर कंपनीने सामंजस्याने चर्चा करण्याची तयारी दर्शवली मात्र वर्षभरात कंपनीने कोणतीही चर्चा न केल्याने भारतीय मजदूर संघाने संपाची नोटीस बजावत आजपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे

    -कामगारांची पगारवाढ, घरभाडे भत्ता, शिक्षण भत्ता, रेस्क्यू भत्ता, मेडिक्लेम अशा विविध 22 मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.कुसगाव येथील आयआरबी कंपनीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे

    -या आंदोलना दरम्यान द्रुतगती महामार्गावर अपघात झाल्यास मोठी हानी होऊ शकते

  • 28 Oct 2021 04:50 PM (IST)

    जामीन मंजूर, कोर्टाची पूर्ण ऑर्डर उद्या मिळेल- मुकुल रोहतगी

    मुंबई : उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले आहेत. दोन्ही बाजून ऐकल्यानंतर कोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे. मूनमून धमेचा, अरबाज मर्चंट तसेच आर्यन खान या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आलं.

  • 28 Oct 2021 04:46 PM (IST)

    आर्यन खाला जामीन मंजूर, तब्बल 26 दिवसानंतर जामीन

    मुंबई : मुंबई हायकोर्टानं आर्यन खानला दिलासा दिला आहे. आर्यन खानला तब्बल 26 दिवसानंतर जामीन मिळाला आहे. आर्यन खानसाठी मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.

  • 28 Oct 2021 04:37 PM (IST)

    आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु

    आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु

    ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी मांडत आहेत आर्यन खानची बाजू

  • 28 Oct 2021 02:15 PM (IST)

    समाजवादी पार्टीचे मालेगाव शहराध्यक्ष शरीफ हुसैन मंसुरी यांचा कार्यकरत्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

    मालेगाव -

    समाजवादी पार्टीचे मालेगाव शहराध्यक्ष शरीफ हुसैन मंसुरी यांनी आपल्या कार्यकरत्यांसह सह केला राष्ट्रवादी प्रवेश

    मुंबई येथे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर मालेगावात राष्ट्रवादी इन्कमिंग सुरू

  • 28 Oct 2021 02:14 PM (IST)

    बुलडाणा अर्बन पतसंस्थेमध्ये आयकर विभागाची कालपासून चौकशी

    बुलडाणा -

    बुलडाणा अर्बन पतसंस्थेमध्ये आयकर विभागाची कालपासून चौकशी,

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संबधीत चौकशी सुरू असल्याची माहिती,

    चव्हाणांच्या 4 साखर कारखान्यांना कर्ज दिल्याप्रकरणी कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याचे समजते..

  • 28 Oct 2021 02:13 PM (IST)

    कामठी येथील श्री टाॅकीजला आग

    नागपूर-

    कामठी येथील श्री टाॅकीजला रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली.

    तेथील काळजीवाहकाने मालक राजेश शर्मा यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

    त्या नंतर कामठी येथून २ व नागपूर येथून ३ ते ४ अग्निशमनदलाच्या गाड्यांनी आग विझवली.

    श्री टाॅकीज गेल्या १८ महिन्यांपासून बंदच आहे. दिवाळी नंतर सुरू करण्याचा विचार होता.

    या आगीत सुमारे दीड ते दाेन कोटींचे नुकसान झाल्याचा दावा

  • 28 Oct 2021 12:46 PM (IST)

    इंधन दरवाढ आपल्या भल्यासाठी, मुख्यमंत्र्यांची उपरोधिक टीका

    इंधन दरवाढ आपल्या भल्यासाठी

    केंद्र चांगल्या होतूने इंधन दरवाढ करत आहे, मुख्यमंत्र्यांची उपरोधिक टीका

    लोकांनी सार्वजनिक वाहतूक वापरुन प्रवास करावा, या हेतूने इंधन दरवाढ

    रस्त्यावरील खड्डे आणि इंधन दरवाढीवरुन मुख्यमंत्र्यांचं केंद्र सरकारवर टिकास्त्र

  • 28 Oct 2021 12:28 PM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का, चिखली नागरपरिषदेच्या अध्यक्षा प्रिया बोन्द्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    बुलडाणा

    जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का,

    चिखली नागरपरिषदेच्या अध्यक्षा प्रिया बोन्द्रे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश,

    महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते घेतला प्रवेश,

    नगराध्यक्षा पती कुणाल बोन्द्रे यांचा ही काँग्रेस मध्ये प्रवेश,

    तर चिखली नगर परिषद पाणीपुरवठा सभापती गोपाल देव्हढे यांचा ही काँग्रेस मध्ये प्रवेश,

    शिवाय एका जिल्हा परिषद सदस्य सह अनेक कार्यांर्त्यांचा ही प्रवेश,

  • 28 Oct 2021 11:40 AM (IST)

    दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक जगदीश कदम यांच्या शाश्वत या बंगल्यावर ईडीची धाड

    जगदीश कदम यांच्या शाश्वत या बंगल्यावर ईडीची धाड,

    बंगल्यात कागदपत्रांची चौकशी सुरू

    जगदीश कदम दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक आहेत

    केंद्रीय सुरक्षा बलाचे पोलीस बाहेत तैनात

    ते अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे

  • 28 Oct 2021 11:20 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पर्यटकांचा थेट बैलगाडीतून प्रवास

    औरंगाबाद -

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पर्यटकांचा थेट बैलगाडीतून प्रवास

    अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांचा सुरू आहे बैलगाडीतून प्रवास

    एसटी बस बंद असल्यामुळे स्थानिकांनी पर्यटकांसाठी केली बैलगाडीची सोय

    बैलगाडीत बसून पर्यटक करतायत अजिंठा लेणीपर्यंत प्रवास

    अजिंठा लेणी परिसरात खाजगी वाहनांना आहे बंदी

    फक्त एसटी महामंडळाच्या सिएनजी बसने करावा लागतो प्रवास

    एसटी बस बंद असल्यामुळे पर्यटकांनवर बैलगाडीतून प्रवास करण्याची वेळ

  • 28 Oct 2021 11:14 AM (IST)

    नाशिकच्या वणी गावात 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

    नाशिक - नाशिकच्या वणी गावात 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

    वणी बसस्थानक परिसरात जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार,काल रात्री ११ वाजेची घटना

    पीडित महिला आणि तिचा मित्र बस स्थानक परिसरात बसलेले असतांना याच परिसरातील संशयितांनी केला बलात्कार

    वणी पोलीस ठाण्यात ४ संशयितां विरोधात गुन्हा दाखल,संशयित चारही आरोपी अटक

    पीडित महिलेच्या तकराहून वणी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारा सह अट्रोसीटीचा गुन्हा दाखल

  • 28 Oct 2021 11:10 AM (IST)

    सचिन पाटील यानावाने गोसावी फिरत होता - पुणे पोलीस आयुक्त

    सचिन पाटील यानावाने गोसावी फिरत होता

    स्टॉप क्राईम ऑर्गनायझेशनचा मेंबर असल्याचं तो सांगत होता

    आपला आयत निर्यातचा व्यवसाय असल्याचं तो सांगतो

    गोसावींने पुणे पोलिसांना कधीही संपर्क साधला नव्हता

  • 28 Oct 2021 11:02 AM (IST)

    2018 चा फसवणुकीच्या गुन्ह्या संदर्भात गोसावीविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल - पुणे पोलीस आयुक्त

    पुणे -

    2018 ला किरण गोसावी वर फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार होता

    2019 मध्ये त्याला फरार घोषित केले होत

    कात्रजमधील एका लॉजमधून पहाटे किरण गोसावीला ताब्यात घेतलं

    अटक करण्याची कारवाई सुरु आहे

    आता त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायलर झाल्यावर त्याचा शोध सुरु केला

    2018 चा फसवणुकीच्या गुन्ह्या संदर्भात कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे

    गोसावी लखनऊ, फत्तेपुर, जळगाव, लोणावळा या भागात फिरत होता

    गोसावींने आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर तक्रारदारांनी पुढे यावं, पुणे पोलीस आयुक्तांचे आवाहन

  • 28 Oct 2021 09:24 AM (IST)

    दिलीप वळसे पाटील कोरोना पॉजिटीव्ह

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कोरोना पॉजिटीव्ह

  • 28 Oct 2021 08:40 AM (IST)

    के पी गोसावीला पुणे पोलिसांकडून अखेर अटक

    के पी गोसावीला पुणे पोलिसांकडून अखेर अटक

    फरासखाना पोलीस ठाण्यात के पी गोसावीला आणले जाणार

    सकाळी ११ वाजता पुणे पोलीस याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत

  • 28 Oct 2021 08:03 AM (IST)

    केंद्रीय कॅबिनेटच्या समितीची नागपुरातील नागनदी प्रकल्पावर मुहर

    - केंद्रीय कॅबिनेटच्या समितीची नागपुरातील नागनदी प्रकल्पावर मुहर

    - 2 हजार 117 कोटींच्या खर्चाला मंजुरी

    - आठ वर्षांत पुर्ण करायचा आहे प्रकल्प

    - यात 500 किमी सिवरेज नेटवर्क, पंजीकरण स्टेशन कम्युनीटी टॅायलेट उभारणार

    - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट

    - नागपूर महानगरपालिका राबवणार प्रकल्प

  • 28 Oct 2021 07:55 AM (IST)

    नाशकात पेन्शनचे 2 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या जोडप्याला रस्त्यात लुटले

    नाशिक -

    पेन्शनचे 2 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या जोडप्याला रस्त्यात लुटले

    नेहरू गार्डन परिसरात घडली घटना

    दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झटापट करत ओढली हातातील बॅग

    पैशाची बॅग घेऊन दोघे चोरटे झाले फरार

    शहराच्या मध्यवर्तीभर ठिकाणी,रस्त्यात घडलेल्या घटनेने खळबळ

    भद्रकाली पोलिसांकडून चोरांचा तपास सुरू

  • 28 Oct 2021 07:54 AM (IST)

    शाळकरी मुलाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या

    नाशिक -

    शाळकरी मुलाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या

    तलावात बुडवून केलेल्या बेदम मारहाणीत मुदफिर मेकरणी याचा मृत्यू

    जून भांडण मिटवण्यासाठी आले असता, पुन्हा झाली वादावादी

    धक्काबुक्की दरम्यान दोघीणचा तलावात घसरला पाय

    मारहाणीचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद

    CCTV च्या आधारे २ अल्पवयीन संशयित आरोपी अटक

  • 28 Oct 2021 07:53 AM (IST)

    नागपुरात अट्टल वाहनचोरांच्या टोळीला बेड्या

    - नागपुरात अट्टल वाहनचोरांच्या टोळीला बेड्या

    - वाहनचोरांच्या टोळीकडून २७ दुचाकी जप्त

    - नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

    - चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरी केले होते वाहनं

    - वाहनचोरांच्या टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी केली अटक

  • 28 Oct 2021 07:50 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये ही यंदा फटाका बाजार सुरु

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवडमध्ये ही यंदा फटाका बाजार सुरू झालाय

    -पिंपरी गावठाणात दरवर्षी फटाके बाजार भरत असतो, पण कोरोना मुळे त्यात खंड पडला होता

    -यंदा मात्र पुन्हा या ठिकाणी फटका व्यापाऱ्यांनी स्टॉल उभारले असून अनेक व्यापाऱ्यांनी फटाके ही ठेवण्यास सुरुवात केली आहे

  • 28 Oct 2021 07:42 AM (IST)

    कार्तिकी यात्रा होणार की नाही याबाबत रविवारच्या बैठकीत ठरणार

    सोलापूर -

    कार्तिकी यात्रा होणार की नाही याबाबत रविवारच्या बैठकीत ठरणार

    कार्तिकी यात्रा भरवण्याबाबतची चर्चा 31 ऑक्टोबरला पंढरपुरात मंदिर समितीच्या बैठकीत होणार

    मंदिर समिती व प्रांताधिकारी यांचा प्रस्ताव आल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार

    त्यानंतर शासनस्तरावरून कार्तिकी यात्रा बाबतचा निर्णय होणार

  • 28 Oct 2021 07:33 AM (IST)

    के पी गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

    के पी गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

    फरासखाना पोलीस ठाण्यात के पी गोसावीला आणलं जाणार,

    आज कोर्टात हजर करण्याची शक्यता,

    पुण्याचे सह पोलीस आयुक्त रविद्र शिसवे यांची माहिती

  • 28 Oct 2021 07:12 AM (IST)

    नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये, गुन्हेगारांविरुद्ध आठवडाभरात तीन मोहिम

    - नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये, गुन्हेगारांविरुद्ध आठवडाभरात तीन मोहिम

    - नागपुरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलीसांचा धडक मोहिम

    - सहा तासांत ३० गुन्हे दाखल, ३१ आरोपींना अटक

    - पोलीसांनी आरोपींकडून ३१ शस्र जप्त

    - २४ ॲाक्टोबरपासुन गुन्हेगार आणि अवैध धंद्याविरुध्द पोलीसांची मोहिम

    - नागपूर पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई

  • 28 Oct 2021 07:12 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

    पिंपरी चिंचवड -

    - पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

    - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार या बदल्या करण्यात आल्यात

    - पुढील तीन ते चार महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे, निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही

    - मात्र, प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे

    - त्याचाच एक भाग म्हणून पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

    - आणखी काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे सांगितले जात आहे

  • 28 Oct 2021 07:07 AM (IST)

    आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महापालिकेमध्ये नगरसेवकाची संख्या वाढणार

    पिंपरी चिंचवड

    -आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महापालिकेमध्ये नगरसेवकाची संख्या वाढणार

    -11 नगरसेवक वाढून ही संख्या 139 पर्यंत पोहचणार

    -सध्या महापालिकेचे 128 नगरसेवक आहेत,11 नगरसेवक वाढणार असल्याने महापालिकेची नगरसेवक संख्या 139 होणार आहे

    -महापालिका क्षेत्राची वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकामधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय

  • 28 Oct 2021 06:33 AM (IST)

    भारत पाकिस्तान मॅचनंतर विजय उत्सव साजरा करणार्‍यांवर कारवाई

    उत्तर प्रदेश

    भारत पाकिस्तान मॅचनंतर विजय उत्सव साजरा करणार्‍यांवर कारवाई

    उत्तरप्रदेश पोलिसांनी सात जणांना घेतल ताब्यात

    पाच जिल्ह्यांमधून पाकिस्तानच्या विजयाचा उत्सव साजरा करणाऱ्यांवर कारवाई

    2 महिलाही पोलिसांच्या ताब्यात

  • 28 Oct 2021 06:32 AM (IST)

    25 कोटी रुपये प्रभाकर साईल यानेच घेतले, पंच किरण गोसावीचा खळबळजनक आरोप

    मुंबई क्रूझ पार्टी प्रकरण

    25 कोटी रुपये प्रभाकर साईल यानेच घेतले

    प्रभाकर आणि त्याच्या भावांची चौकशी करा

    पंच किरण गोसावीचा खळबळजनक आरोप

    प्रभाकर आणि त्याच्या भावांचे कॉल रेकॉर्ड तपासा

    प्रभाकरच्या मागे जे मंत्री आहेत त्यांनी याबाबतची माहिती घ्यावी

    मी मराठी माणूस म्हणून माझ्यामागे कुणीतरी उभं राहावं - किरण गोसावी याची व्हिडीओमधून मागणी

    अद्यापही किरण गोसावी पोलिसांपासून दूरच

    किरण गोसावी याचा व्हिडिओ tv9 मराठीच्या हाती

Published On - Oct 28,2021 6:28 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.