AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan: आर्यन खान 11 वाजून 2 मिनिटांनी तुरुंगाबाहेर येताच दिमतीला पांढरी रेंज रोव्हर कार, ‘मन्नत’पर्यंत जाताना काय काय घडलं?

तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खान आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला. बाहेर येताच तो थेट पांढऱ्या शुभ्र रेंज रोव्हर कारच्या पाठच्या सीटवर बसला. (Aryan Khan comes out arthur road jail and goes towards mannat by white range rover car)

Aryan Khan: आर्यन खान 11 वाजून 2 मिनिटांनी तुरुंगाबाहेर येताच दिमतीला पांढरी रेंज रोव्हर कार, 'मन्नत'पर्यंत जाताना काय काय घडलं?
Aryan Khan
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 1:45 PM
Share

मुंबई: तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खान आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला. बाहेर येताच तो थेट पांढऱ्या शुभ्र रेंज रोव्हर कारच्या पाठच्या सीटवर बसला. कुणाशीही बोलला नाही. त्याने चेहराही दाखवला नाही. त्यानंतर त्याचा ताफा थेट मन्नतच्या दिशेने गेला. मन्नतभोवती चाहत्यांची गर्दी होती. पण त्यांनाही त्यांनी झलक दाखवली नाही.

आज सकाळी 11 वाजून 2 मिनिटांनी आर्यन खान आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर आला. त्याला पाहण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, आर्यन पटकन कारमध्ये बसल्याने चाहत्यांना तो दिसला नाही. शाहरुख खानचा खासगी सुरक्षारक्षक रवी सिंह आणि एक बाऊन्सर आर्यनला घेण्यासाठी तुरुंगात गेले होते.

शाहरुख, गौरीबाबतचा सस्पेन्स कायम

शाहरुख खानची रेंज रोव्हर गाडी आर्थर रोड तुरुंगाच्या एकदम बाजूलाच उभी होती. या गाडीच्या पाठी शाहरुखच्या आणखी दोन गाड्या उभ्या होत्या. रेंज रोव्हरची पाठची सीट आर्यनला बसण्यासाठी रिकामी ठेवण्यात आली होती. या कारला काळ्या काचा होत्या. त्यामुळे गाडीत शाहरुख आणि गौरी खान आहेत की नाही हे दिसू शकले नाही. आर्यन खान तुरुंगाच्या बाहेर येताच शाहरुखच्या अंगरक्षकांनी गाडीचा दरवाजा तात्काळ उघडला. काही सेकंदात आर्यन खान कारमध्ये बसला आणि त्यानंतर लगेचच कार मन्नतच्या दिशेने रवाना झाली. आर्यनला मीडियापासून लांब ठेवण्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.

मीडिया आणि फॅन्सपासून दूर

इकडे मन्नतवरही शाहरुखच्या फॅन्सने प्रचंड गर्दी केली होती. आर्यनच्या स्वागतासाठी ढोलताशे वाजवण्यात येत होते. सकाळपासूनच फॅन्स मन्नतच्याबाहेर जमले होते. काहींनी तर फटाके फोडून आर्यनचं स्वागत केलं. मन्नतवर मोठी गर्दी उसळल्याने आर्यनची गाडी काही काळ बाहेर थांबली होती. गर्दी पांगवल्यानंतर गाडी मन्नतमध्ये गेली. तीन गाड्या मन्नतमध्ये गेल्या. त्या गाड्यांमध्ये कोण कोण होते हे काहीच कळू शकले नाही. आर्यनला आणायला शाहरुख, गौरी गेले होते की नाही याचा सस्पेन्स शेवटपर्यंत राहिला.

बंगळूरू, अहमदाबाद, औरंगाबादहूनही फॅन्स आले

मन्नतच नव्हे तर ऑर्थर रोड तुरुंगाबाहेरही शाहरुखच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. अगदी बंगळुरू, अहमदाबाद आणि औरंगाबादहूनही फॅन्स आले होते. शाहरुखच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केल्याने पोलिसांना तुरुंगाबाहेर बॅरिकेड्स उभाराव्या लागल्या असून पोलीस बंदोबस्तही वाढवावा लागला आहे. शाहरुखचे अंगरक्षक तुरुंगाबाहेर आल्यावर समर्थकांनी एकच गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना त्यांना पांगवावे लागले.

संबंधित बातम्या:

Aryan Khan Release From Jail Live Updates | शाहरुख खानचे अंगरक्षक आर्थर रोड जेलमध्ये पोहोचले

कुडाळ मालवणमधून 2024 ला विजयी होणारच, निलेश राणेंनी रणशिंग फुंकलं

ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा, दिवाळी बोनस म्हणून 750 रुपये, त्यासाठीही नियम अटी!

(Aryan Khan comes out arthur road jail and goes towards mannat by white range rover car)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.