AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Release From Jail | अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, ‘मन्नतवर दिवाळी’

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला.

Aryan Khan Release From Jail | अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, 'मन्नतवर दिवाळी'
आर्यन खान तुरुंगाबाहेर
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 11:06 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान जेलबाहेर आला आहे. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. आर्यनची  ‘मन्नत’वर 27 दिवसानंतर घरवापसी झाली आहे.

आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण काल सुटकेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार लागली. आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली.  सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर 11 वाजताच्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावरही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडलं?

2 ऑक्टोबर : कथित ड्रग्स पार्टी मुंबईजवळच्या समुद्रात सुरू होती, क्रूझ पार्टीवर छापा टाकला.

3 ऑक्टोबरः शाहरुखच्या मुलासहीत तीन जण ताब्यात, आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धुमेचाला अटक झाली

4 ऑक्टोबरः ड्रग्स कारवाईतला पहिला वाद चव्हाट्यावर आला. तसेच के. पी. गोसावीचा आर्यनबरोबरचा एक सेल्फी व्हायरल झाला आणि हाच या प्रकरणातला पहिला वाद ठरला

6 ऑक्टोबरः नवाब मलिकांकडून पत्रकार परिषद घेऊन कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कारवाई बनावट असल्याचा दावा, मनीष गोसावीवर प्रश्नचिन्ह, त्यानंतर एनसीबीनं पत्रकार परिषद घेत गोसावी आणि भानुशाली साक्षीदार असल्याचं सांगितलं.

7 ऑक्टोबरः मनीष भानुशाली समोर आला, त्यानं देशहितासाठी एनसीबीला ड्रग्स पार्टीची टिप दिल्याचा दावा केला, मनुष्यबळ कमी असल्यानं अरबाज मर्चंडला एनसीबी कार्यालयात नेल्याचं भानुशालीनं सांगितलं.

9 ऑक्टोबरः नवाब मलिका पुन्हा एकदा समोर आले, छापेमारीवेळी 11 नव्हे, तर 14 लोकांना ताब्यात घेतल्याचा दावा, भाजप नेत्याच्या नातलगासह तीन जणांना एनसीबीनं सोडल्याचं मलिकांनी सांगितलं.

14 ऑक्टोबरः पुणे पोलिसांनी एनसीबी प्रकरणातला साक्षीदार के. पी. गोसावीविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यात लूकआऊट नोटीस जारी केली.

16 ऑक्टोबरः नवाब मलिकांनी थेट समीर वानखेडे आणि त्यांच्या बहीण यास्मिन वानखेडेंवर खंडणीचे आरोप केले. कोरोना काळात सेलिब्रिटींना धमकावून दोघांनी मालदीवमध्ये प्रकरण सेटल केल्याचा आरोप केला. यास्मिन वानखेडेंनी पुरावे देण्याचं आवाहन केलं.

21 ऑक्टोबरः चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स पाठवलं, आर्यन खान प्रकरणात तिचा सहभाग असल्याच्या संशयावरून तिच्या घरावर छापा टाकला

24 ऑक्टोबरः या प्रकरणातला साक्षीदार प्रभाकर साईलकडून प्रकरणाला नवं वळण, साक्षीदारानंच समीर वानखेडेंवर खंडणीचा आरोप केला, प्रभाकर साईल हा के. पी. गोसावीचा बॉडीगार्ड आहे.

25 ऑक्टोबरः समीर वानखेडेंनी खोटं जात प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा नवाब मलिकांचा दावा, त्यानंतर समीर वानखेडेंची चौकशी सुरू

26 ऑक्टोबरः समीर वानखेडे यांची पत्नी आणि बहीण यांनी नवाब मलिकांचे आरोप फेटाळले, तसेच त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

27 ऑक्टोबरः क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने या जामीन अर्जाला परवानगी दिली आहे. अवीन साहू आणि मनीष राजगरिया यांना जामीन मिळाला आहे.

28 ऑक्टोबरः तीन आठवडे उलटून गेले तरी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी त्याला जामीन मिळालेला नाही. कोर्टाने आजचा युक्तीवाद संपल्यानंतर सुनावणी उद्यावर ढकलली आहे. कोर्टात आजी तीनही आरोपींच्या वकिलांनी बाजू मांडली.

29 ऑक्टोबरः मुंबई उच्च न्यायालयाने तिनही आरोपींना जामीन दिला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने जवळपास तीन दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या मिळेल आणि मला आशा आहे की हे तिघेही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा शनिवारी बाहेर येतील, अशी माहिती आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.