राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र

"विद्यार्थ्यांच्या शाळेची फी वाढ थांबवा. उलट फीमध्ये त्यांना 10 टक्के सूट मिळावी", अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे (Ashish Shelar letter to Varsha Gaikwad).

राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र

मुंबई : “राज्यात कोरोनाचं मोठं संकंट आहे (Ashish Shelar letter to Varsha Gaikwad). सर्व पालक आणि विद्यार्थी या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. मात्र, काही शाळा 10 ते 30 टक्क्यांपर्यंत फी वाढ करण्याची योजना आखत आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शाळेची फी वाढ होऊ नये. उलट फीमध्ये त्यांना 10 टक्के सूट मिळावी”, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे (Ashish Shelar letter to Varsha Gaikwad).

आशिष शेलार यांनी ट्विटरवर पत्राचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. “राज्यातील बर्‍याच शाळा 10 ते 30 टक्क्यांपर्यंत फी वाढीची योजना आखत आहेत किंवा त्यांनी तशी योजना लागूदेखील केली आहे. त्यामुळे याकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे. सद्यस्थितीत फी वाढ करण्यात येऊ नये”, असं आशिष शेलार ट्विटरवर म्हणाले.

“कोरोना संकंटाच्या काळात बऱ्याच शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाची पद्धत अवलंबली जात आहे. त्यामुळे शाळांचा वीज आणि इतर खर्च वाचत आहे. शाळांनी हीच वाचलेली रक्कम फीमधून सूट देऊन विद्यार्थ्यांना परत करावी, अशी मागणी मी शिक्षण विभागाकडे केली आहे”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“देशावर सध्या कोरोनाचं मोठं संकंट आहे. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थ्यांची फी वाढ करु नये, असा आदेश शिक्षण विभागाने द्यावा”, अशी विनंती आशिष शेलार यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांना केली.

संबंधित बातम्या :

पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : खासदार हुसेन दलवाई

औरंगाबादेत मोठ्या शिताफीने पकडून कोठडीत डांबलं; आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; 30 पोलीस क्वारंटाईन

Published On - 5:03 pm, Wed, 29 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI