औरंगाबादेत मोठ्या शिताफीने पकडून कोठडीत डांबलं; आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; 30 पोलीस क्वारंटाईन

औरंगाबादेत मोठ्या शिताफीने पकडून कोठडीत डांबलं; आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; 30 पोलीस क्वारंटाईन

औरंगाबादेमध्ये नशेच्या गोळ्यांचा व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी (Accused Tested Corona Positive Aurangabad) अटक केली होती

Namrata Patil

|

Apr 29, 2020 | 4:20 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना औरंगाबादमध्ये एक धक्कादायक (Accused Tested Corona Positive Aurangabad) प्रकार समोर आला आहे. नशेच्या गोळ्यांच्या व्यापार करणाऱ्या एका आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली होती. मात्र हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे निम्म पोलीस स्टेशन क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे.

औरंगाबादेमध्ये नशेच्या गोळ्यांचा व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी (Accused Tested Corona Positive Aurangabad) अटक केली होती. या आरोपीला ट्रप लावत अथक परिश्रम करुन पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

यावेळी आरोपीच्या कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.यामुळे आता औरंगाबादमधील निम्म पोलीस स्टेशन क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे.

त्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या तब्बल 38 अधिकारी आणि कर्मचारी आले आहेत. इतकंच नव्हे तर तीन खाजगी व्यक्तींसह एक फोटोग्राफरही या व्यक्तीच्या संपर्कात आला आहे. या सर्वांच्या स्वॅब टेस्ट घेण्यात येणार आहे. दरम्यान 38 पोलिसांपैकी 30 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

दरम्यान आज औरंगाबादेत आणखी 11 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना रुग्णांची संख्या 120 वर पोहोचली आहे.

राज्यात 729 नवे रुग्ण 

राज्यात काल (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली (Accused Tested Corona Positive Aurangabad) आहे.

संबंधित बातम्या : 

पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिरिक्त निर्बंध, पोलीस प्रशासनाच्या हालचाली

कसबा-विश्रामबाग वाडा परिसरात 20 नवे रुग्ण, भवानी पेठेत संख्या 263 वर, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें