कोल्हापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव, मुंबई-सावंतवाडीमार्गे भुदरगडला आलेल्या तरुणाला लागण

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डी भागात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 12 वर गेली आहे (Corona Patient found in rural area of Kolhapur)

कोल्हापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव, मुंबई-सावंतवाडीमार्गे भुदरगडला आलेल्या तरुणाला लागण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भुदरगड तालुक्यातील आकुर्डी भागात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 12 वर गेली आहे. (Corona Patient found in rural area of Kolhapur)

आतापर्यंत कोल्हापूरच्या शहरी भागात कोरोनाचे रुग्ण सापडले होते. मात्र ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त सापडल्याने धाकधूक वाढली आहे. मुंबई, सावंतवाडी असा प्रवास करुन हा रुग्ण आकुर्डीत आल्याची माहिती आहे.

कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 12 वर गेली आहे. आतापर्यंत चौघे जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा : गुड न्यूज! पुण्यात चार महिन्याच्या चिमुरड्याची कोरोनावर मात

कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहात 80 बेडचं कोविड केअर सेंटर तयार केलं आहे. तंत्रशिक्षण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात चौथ्या मजल्यावर हे सेंटर तयार करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोल्हापूर परिसरात असलेल्या एमआयडीसीमधील कंपन्या सुरु करायला जिल्हा प्रशासनान ऑनलाईन परवानगी दिली आहे. त्यामुळे एमआयसीसी परिसरात पुन्हा कारखान्यांचा ‘खडखडाट’ सुरु झाला आहे.

लॉकडाऊनच्या काळात कंटेनरमध्ये लपून मुंबईहून कोल्हापूरला आलेल्या एका कामगाराला 19 एप्रिल रोजी ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. याच कंटेनरमधून प्रवास केलेल्या 42 वर्षीय महिलेचे रिपोर्टही पॉझिटिव्ह (20 एप्रिल) आले होते. त्यावेळी कोल्हापुरात पहिल्यांदाच सलग दोन दिवस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.

राज्यात काल (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली आहे.

(Corona Patient found in rural area of Kolhapur)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *