एक निवडणूक काय जिंकली, शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू लागलीय; आशिष शेलारांचा टोला

एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. (ashish shelar slams shiv sena over dadra nagar haveli by-election result)

एक निवडणूक काय जिंकली, शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू लागलीय; आशिष शेलारांचा टोला
आशिष शेलार
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 4:04 PM

मुंबई: एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. शिवसेना नेते संजय राऊत तर कोटही शिवून बसले असतील, असा चिमटाही आशिष शेलार यांनी काढला.

आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शेलार यांना दादरा नगर हवेलीतील शिवसेनेच्या विजयाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेने हुकूमशाहीबद्दल बोलावं म्हणजे दिवसाढवळ्या संध्याकाळचा आणि रात्रीचा चंद्र कसा दिसतो याचं वर्णन करण्यासारखं आहे. ते एक निवडणूक जिंकले. पण संपूर्ण देशात आम्हाला मोठं आव्हान उभं केलं, किंबहुना स्वप्नात पंतप्रधान बनण्याचीही स्वप्ने पडत असतील, मंत्रीमंडळाची रचनाही केली असेल, खातेवापटही केलं असेल, राऊत साहेब कोट शिवूनही बसले असतील. त्यामुळे तुमच्या स्वप्न रंजनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे, असा टोला शेलार यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी करून दाखवावं

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधानांनी देशवासियांना दिवाळीची भेट दिली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. आंदोलन आणि माथी भडकावून लोकांना न्याय मिळणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले बोलण्यापेक्षा राज्यातील पेट्रोलचे दर आणखी कमी होऊ शकतात, ती इच्छाशक्ती राज्य सरकारने दाखवावी, असं आव्हानच त्यांनी दिलं. तसेच, राज्यात दोन वादळ झाली अतिवृष्टी झाली. मात्र अद्याप शेतकरी राजाला मदत मिळाली नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत करावी, भाजपा तुमच्या पाठिशी उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सत्ता आल्यानंतरच खंजीराची भाषा सूचते

यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. परमबीर सिंग यांनी पूर्वी दिलेले पुरावे पुरेसे आहेत. म्हणूनच या संदर्भात चौकशी करावी असे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. यावर मी फार बोलणार नाही. कारण प्रकरण कोर्टात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. सत्तेत आल्यानंतर या मंत्र्यांना खंजीराची भाषा सुचायला लागली आहे, असा टोला त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांना लगावला.

संबंधित बातम्या:

‘ते रोज लवंग्या फोडतात, आम्ही बॉम्ब फोडणार’, प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा

‘फक्त घोषणा आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत’, रक्षा खडसे यांची ठाकरे सरकारवर टीका

अनिल परब शुद्धीत नव्हते, ईडीला काय कबुली जबाब दिला हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे काय?; किरीट सोमय्यांचा सवाल

(ashish shelar slams shiv sena over dadra nagar haveli by-election result)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.